Breaking

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे,


*उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे,

यासाठी आज उस्मानाबाद येथे मल्हार आर्मीच्या वतीने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना जाहीर निवेदन देण्यात आले*


.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात सर्व जाती-धर्माच्या जनतेसाठी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यत लोककल्याणकारी कार्य केलेली आहेत व त्यांचे आजोळ हे जिल्ह्यातील चोराखळी हे ठिकाण आहे.त्यांचे नाव महाविद्यालयाला दिल्यास तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळू शकते व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ते वाटचाल करू शकतात.यासाठी त्यांचे नाव महाविद्यालयाला देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा अशी मागणी मल्हार आर्मीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी मल्हार आर्मी संपर्क प्रमुख - आण्णासाहेब बंडगर, युवक कार्याध्यक्ष वैभव लकडे उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष - समाधान पाडुळकर,उस्मानाबाद तालुका अध्यक्ष - अशोक गाडेकर,तुळजापूर तालुकाध्यक्ष - शहाजी हाक्के,उस्मानाबाद शहराध्यक्ष - गणेश सोनटक्के,युवक शहराध्यक्ष - रवी देवकते,रोहन महानवर,सागर देवकते,ओंकार देवकते,अरविंद देवकते यांच्यासह डॉ.संतोष पाटील,सोमनाथ लांडगे सर,नगरसेवक राहुल काकडे,जय हनुमान ग्रुप जिल्हाध्यक्ष - बालाजी वगरे,नरसिंग मेटकरी हे मार्गदर्शक उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा