Breaking

शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

गुरूदेव सेवाश्रम ट्रस्टच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कारजामनेर


गुरूदेव सेवाश्रम ट्रस्टच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार

जामनेर तालुका प्रतिनिधी : 
विजय सुर्यवंशी

        आज संध्याकाळी ६. ३० वाजता कलर्स संगीत महाविद्यालय वाकी रोड जामनेर येथे गुरूदेव सेवाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष श्यामचैतन्यजी बापू यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन श्यामचैतन्यजी बापू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शामचैतन्यजी बापू यांनी पत्रकार हा देशाचा आधारस्तंभ आहे. कोरोना काळात पत्रकारांनी जीवाची पर्वा न करता वेळोवेळी आपल्या लेखनीतून नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी ज्या सुचना केल्या त्याबद्दल पत्रकारांचे कौतुक ही केले. तसेच प्रदीप गायके यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जामनेर शहरातील पत्रकार मोहन सारस्वत, सुरेश महाजन, प्रदीप गायके, सुनिल नेरकर, अमोल महाजन, मिलिंद लोखंडे,  रूपेश बिऱ्हाडे, भानुदास चव्हाण, विजय सुर्यवंशी आदी  सर्व पत्रकार, न्युज रिपोर्ट्स उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्यामचैतन्यजी बापू, संदीप पवार सर, मिलिंद लोखंडे, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खुप मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा