Breaking

शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

टेंभूणी पोलीस ठाणे हद्दीतील सूज्ञ नागरिक व। पॅनल प्रमूख,कार्यकर्ते, लोक मतदारयांच्या साठी महत्वाच्या सूचना*





टेंभूणी पोलीस ठाणे हद्दीतील सूज्ञ नागरिक व। पॅनल प्रमूख,कार्यकर्ते, लोक  मतदारयांच्या साठी महत्वाच्या सूचना* 

 उद्या दिनांक १५ जानेवारी  २०२१ रोजी टैंभणी पोलीस ठाणे हद्दीत एकूण ३२ ग्रामपंचायतीचे ३२ गावांमध्ये मतदान होत आहे. त्यास अनुसरून नागरिकांनी व मतदारांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. पालन न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी.

▪️मतदान केंद्राचे बाहेर 100 मीटरवर पांढरी रेषा असेल त्याच्या आत मतदार किंवा इतर नागरिकांनी कोणतेही वाहन आणू नये, वाहन पार्क करुन नये किंवा तेथे विनाकारण थांबू नये.

▪️100 मीटरच्या आत जे दुकान, हॉटेल, टपरी किंवा इतर अस्थापना असतील त्या मतदानाचे वेळी सकाळी 07.30 ते सायंकाळी मतपेट्या रवाना होई पर्यंत बंद ठेवाव्यात. पांढऱ्या रेषेच्या आत ज्या लोकांची घरे येतात तेथे फक्त घरातील लोकांनीच थांबावे. बाहेरील लोकांना घरांमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. जर त्यांनी बाहेरील लोकांना प्रवेश दिला तर घर मालकावर किंवा कुटुंबीयांवर कारवाई करण्यात येईल.

▪️BLO हे 100 मीटरच्या बाहेर थांबतील. तेथे गर्दी होईल असा कोणताही प्रकार करणार नाहीत.

▪️पॅनल प्रमुख,कार्यकर्ते, सूज्ञ नागरिक  हे 200 मीटरच्या बाहेर एक टेबल व दोन खुर्ची ठेवून मतदारांना बुथची माहिती देऊ शकतात. पण त्या ठिकाणी मंडप टाकणार नाहीत. 2 पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी थांबणार नाहीत तसेच चिन्हाच्या चिठ्ठ्या देणार नाहीत.

▪️ माननीय जिल्हाधिकारी, सोलापूर यांचा जमावबंदीचा आदेश लागू असल्याने गावात व इतर ठिकाणी लोक जमावाने थांबणार नाहीत. मतदान करून लगेच आपापले घरी जातील.

 ▪️मतदानाचे वेळी मतदान केंद्रात कोणीही मोबाईल घेऊन जाणार नाहीत. मतदान करते वेळेस चॅटिंग करणार नाहीत. मोबाईलवर मतदान करत� ज्या इसमांना 144 (3) चा आदेश दिलेला आहे व हद्दपार केले आहे त्यांनी मतदानाच्या दिवशी म्हणजे दिनांक 15/01/2021 रोजी त्यांच्या गावाच्या हद्दीत फक्त मतदान करण्यासाठी यायचे आहे, मतदान झाल्यानंतर थांबायचे नाही. त्यांनी परत गावाच्या हद्दीच्या बाहेर जायचे आहे. जर बेकायदा थांबलेला दिसला तर गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल.

▪️ बंदोबस्तात असलेले पोलीस किंवा मतदान प्रक्रियेत असणारे अधिकारी व कर्मचारी हे आपली वाहने मतदान केंद्र किंवा शाळेच्या कंपाऊंडच्या आत लावणार नाहीत.  त्यांनी वाहने 100 मिटरच्या बाहेर पार्क करायची आहेत.

▪️ उमेदवार किंवा त्यांच्या वतीने कोणी मतदारांवर दबाव टाकत असेल किंवा प्रलोभने दाखवत असेल व अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई केली जाईल.

 ▪️सर्व मतदान केंद्रावर पोलीसांकडून कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. जर त्या ठिकाणी एखाद्या नागरिक किंवा मतदार वारंवार येत असेल तर त्याची शूटिंग व फोटोग्राफी घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मतदारांनी एखाद्या मतदान केंद्रावर वारंवार ये-जा करू नये.

▪️ग्रामपंचायत निवडणूक संदर्भाने एखादा गुन्हा दाखल झाल्यास पुढील पंधरा वर्षे पोलीस स्टेशनला त्यासंबंधाने रेकॉर्ड जतन करून ठेवले जाते व प्रत्येक निवडणुकीमध्ये संबंधित आरोपींवर कारवाई केली जाते, याची माहिती सर्वांना असावी.

▪️वरील सूचनांचा व नियमांचा भंग केला किंवा दंगा, मस्ती, गोंधळ, आगाऊपणा केला तर गुन्हे दाखल करून अटक करून रिमांड घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणाचीहीगययृ केली जाणार नाही. असे टेंभुर्णी पोलीस स्टेशन कडून आव्हान करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा