*लोकसेवा युथ फाऊंडेशन च्या वतिने प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला*
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
प्रजासत्ताक दिन केवळ एक दिवस उत्साहाने साजरा करून आपली जबाबदारी संपत नाही! हा दिवस आहे देशाप्रति समर्पित राहण्याची प्रतिज्ञा करण्याचा! संविधानावर निष्ठा ठेऊन लोकशाही बळकट करण्यास हातभार लावण्याचा निर्धार करण्याचा! देशाने आपल्याला बरेच काही दिले आहे, त्याची जमेल तशी परतफेड करण्याचा संकल्प करण्याचा!
अनेक शूरवीर क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यवीरांनी मोजलेल्या त्यागाची किंमत न विसरता आपण आपला भारत देश अधिक मजबूत करूया…! या दिनाचे औचित्य साधून लोकसेवा युथ फाऊंडेशन व शिवशंभो प्रतिष्ठान इंदापूर यांच्या वतीने माऊली बाल अनाथ आश्रम सरस्वतीनगर, इंदापूर येथील अनाथ मुलांना ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमावेळी लोकसेवा युथ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष गौरव भैय्या राऊत मित्र परिवार तसेच शिवशंभो प्रतिष्ठान अध्यक्ष शुभम भैय्या पवार मित्र परिवार उपस्थित होता. आणि युवकांकडून चांगल्या प्रतीचा उपक्रम राबवून एक समाजामध्ये चांगला संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद!!
या वेळी उपस्थित प्रशांत उंबरे,अध्यक्ष उमंग प्रतिष्ठान अजिंक्य जावीर,संचालक-राजमाता ग्रामीण सहकारी संस्था व्यंकटेश वाशिंबेकर,राहुल शिंदे,निहाल पठाण,मंगेश घाडगे,संदीप शिंदे,ऋषी चव्हाण,तनिष राऊत,प्रविण शिंदे,प्रज्वल सोमवंशी,शिवतेज दडस,आदित्य चौगुले,अजय भगत,साहील मोमीन,सागर करचे,पवन जाधव
नितीन कदम,मारुती जागतप रवि क्षीरसागर सैफ शेख व इतर उपस्थीतीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा