Breaking

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

अखिल भारतीय साहित्य परिवार शब्द सारथी समूह आयोजित काव्यसादरीकरण स्पर्धेत सरिता कलढोणे प्रथम*





     अखिल भारतीय साहित्य परिवार शब्द सारथी समूह आयोजित काव्यसादरीकरण स्पर्धेत सरिता कलढोणे प्रथम
*जामनेर प्रतिनिधी/विजय सुर्यवंशी*

अखिल भारतीय साहित्य परिवार शब्द सारथी समूह आयोजित भव्य राज्यस्तरीय स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धेचे आयोजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तसेच शब्द सारथी समूहाचे संस्थापक श्री.दीपक चतुरकार यांची भाची श्रीनिधी इंगळे आणि त्यांची पुतणी सावी चतुरकार  यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेचा विषय 'माझी लेक माझा अभिमान' हा असा होता. या स्पर्धेचा निकाल जेष्ठ साहित्यक आदरणीय सौ. सुमतीताई पवार आणि दैनिक रयतेचा वालीचे संपादक श्री आदरणीय शाहू भारती सर यांच्या उपस्थित संपन्न झाला. या स्पर्धेत जुन्नर येथील कवयित्री सरिता कलढोणे (काव्यसरिता )यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला . शब्द सारथी सन्मान पत्र व पुस्तके भेट देऊन त्यांना गौरवण्यात आले. सर्व स्तरातून त्यांचे कौतूक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा