Breaking

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

*जामनेर नगर परिषद आयोजित हरित सायकल रॅलीचे आयोजन*

जामनेर नगर परिषद आयोजित हरित सायकल रॅलीचे आयोजन*
*जामनेर प्रतिनिधी /विजय सुर्यवंशी*

जामनेर नगर परिषद अंतर्गत माझी वसुंधरा अभियान  आणि स्वच्छ सर्वेक्षण - 2021 आयोजित हरित सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरणाचे संरक्षण आणि  संवर्धन व्हावे, शिवाय हवेतील प्रदुषणाचे प्रमाण कमी व्हावे, तसेच मानवी शरीर निरोगी रहावे हा प्रमुख हेतू या हरित सायकल रॅली मागचा होता. महाराणा प्रताप चौक, नगरपरिषद चौक, जामनेर पुरा, जळगाव रोड, सोनबर्डी असा या हरित सायकल रॅलीचा मार्ग होता. या रॅलीचा समारोप सोनबर्डीवर पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आला. हरित सायकल रॅलीत सहभागी स्पर्धकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
         यावेळी राहुल पाटील मुख्याधिकारी नगर परिषद जामनेर, दुर्गेश सोनवणे, सुरज पाटील, प्रदीप धनके, दत्तू जोहरे, गजानन माळी, आशिष सहाने, संतोष सराप, रूपेश पाटील, संतोष बारी, डाॅ. नीळकंठ पाटील तसेच नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, मोठ्या संख्येने सायकल रॅलीचे स्पर्धेक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा