स्वामी विवेकानंद आणि माॅ साहेब जिजाऊ यांचे प्रतिमा पुजन
जामनेर तालुका प्रतिनिधी :
विजय सुर्यवंशी
आज दि. १२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९ वाजता राजमाता माॅ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात माजी जलसंपदामंत्री मा. आ. गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हर्षल शिवाजी पालवे, कोरोना काळात रूग्णांना जागेवर जेवन वाटप करणारा योगेश माळी, आरोग्य क्षेत्रात काम करणारे ईश्वर चौधरी / गणेश चौधरी, युवा पत्रकार अमोल महाजन, युवा राजकीय नेतृत्व अतिश झाल्टे यांचा माजी जलसंपदामंत्री मा. आ. गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, रवींद्र झाल्टे तालुका सरचिटणीस, शरद पाटील उपनगराध्यक्ष, जेष्ठ नेते छगन झाल्टे, डाॅ. प्रशांत भोंडे, बाबुराव हिवराळे, राजधर पांढरे, नितीन झाल्टे, सुभाष पवार, सुहास पाटील, दत्तू काळे, हर्षल चौधरी, दिपक तायडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा