Breaking

मंगळवार, १२ जानेवारी, २०२१

जामनेर शहरात राजमाता माॅ साहेब जिजाऊ जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिरजामनेर




जामनेर शहरात राजमाता माॅ साहेब जिजाऊ जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर

जामनेर तालुका प्रतिनिधी :
विजय सुर्यवंशी



      जामनेर तालुका फोटोग्राफी असोसिएशन तर्फे राजमाता माॅ साहेब जिजाऊ जयंतीनिमित्त जामनेर शहरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे रक्तदान शिबिर भुसावळ रोडवरील सोना इस्टेट समोरील मिर्ची ग्राऊंडवर  आज सकाळी ९ ते २ दरम्यान ठेवण्यात आले होते. शंभर पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून हे शिबीर यशस्वी बनवले. रक्तदान करणार्‍या प्रत्येक रक्तदात्यास माॅ साहेब जिजाऊ यांची प्रतिमा आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हे शिबिर यशस्वी बनविण्यासाठी जामनेर तालुका फोटोग्राफीच्या सर्व सदस्यांनी खुप मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा