ग्रामसेवक सिद्धेश्वर राऊत
मानेगावातील दत्त मंदिराच्या कामांसाठी सिद्धेश्वर राऊत यांचेकडून 21 हजारांची देणगी
टेंभुर्णी / प्रतिनिधी- (गुंड सर)
- माढा तालुक्यातील मानेगाव येथील दत्त मंदिराच्या वरच्या बाजूला काही दिवसांपूर्वी लोकवर्गणीतून आकर्षक शेडचे काम पूर्ण केले होते परंतु बाजूच्या इतर कामांसाठी निधीची गरज असल्याचे ओळखून पंचायत समितीच्या सदस्या सुजाता राऊत यांचे पती ग्रामसेवक सिद्धेश्वर संदिपान राऊत यांनी उर्वरित कामांसाठी 21 हजारांची देणगी दिली आहे.
मानेगाव येथे लोकवर्गणीतून अनेक कामे मार्गी लावली असून एक चांगली परंपरा चालू आहे.कोणत्याही प्रकारच्या शासकीय निधी अगर योजनेची वाट न पाहता गरजेनुसार लोकवर्गणीतून कामे केली जातात. सध्या दत्त मंदिर आवाराच्या परिसरात शेड व बाजूचे काम सुरू आहे. त्याचबरोबर गावातील राममंदिराचेही काम लोकवर्गणीतून प्रगतीपथावर आहे तसेच दोन दिवसांपूर्वीच पोलिस चौकी परिसरात लोकवर्गणीतून बोअरवेल व मोटार बसविली आहे, दोन वर्षांपूर्वी येथील सुज्ञ व जागरूक तरुणांनी गावात एक अन्नपूर्णा वाचनालय व अभ्यासिका सुरू केली आहे,पावसाचे वाहून वाया जाणारे पाणी लोकवर्गणीतून चारी खोदून सिमेंट नळ्यांद्वारे गावाच्या शेजारील साठवण तलावात आणून सोडले आहे त्याचा फायदा गावाच्या पाणीपुरवठा योजनेला झाला आहे तसेच मानेगाव पासून सीना नदीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी शेतकरी व ग्रामस्थांच्या मदतीने केले होते त्यामुळे या गावातील शासकीय नोकरदार, सुज्ञ नागरिक व अन्नपूर्णा फाउंडेशनच्या सदस्यांच्या लोकवर्गणीतून अनेक कामे मार्गी लागली असून सध्या काही सुरू आहेत ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी येथील नोकरदार व ग्रामस्थ सार्वजनिक कामासाठी सढळ हाताने मदत करतात.
ग्रामसेवक सिद्धेश्वर राऊत यांनी मोठी रक्कम दत्त मंदिराच्या कामांसाठी देणगी म्हणून दिल्याबद्दल मंदिर पतिष्ठान व ग्रामस्थ आणि दत्त भक्तांनी त्यांचे आभार मानले आहेत..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा