*लक्ष्मी-आनंद टायर अँड रिमोल्डिंग फोडून अज्ञात चोरट्याने ३८ हजार रुपये केले लंपास*
टेंभुर्णी : - येथील लक्ष्मी-आनंद टायर रिमोल्डिंग या ट्रॅक्टर शोरूमचा पाठीमागील पत्रा उचलटून अज्ञात चोरट्याने शोरूम मधील ३८ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे.ही घटना रविवारी एक वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर अकलूज चौकाजवळ घडली.
लक्ष्मी-आनंद शोरूमचे मालक नागेश बोबडे हे रात्री घरी गेले होते.त्यानंतर टायर विक्रीतून आलेले ३८ हजार रुपये मॅनेजर सुजित दैठणकर याने गल्ल्यात ठेवले होते.
त्यानंतर रविवारी रात्री एक वा.सुमारास लक्ष्मी-आनंद टायर अँड रिमोल्डिंग या शोरूमचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून गल्ल्यात ठेवलेले ३८ हजार रुपये चोरून नेले.सोमवारी सकाळी मॅनेजर दैठनकर याने शोरूम उघडले असता त्यास गल्ला उघडा दिसला नंतर सीसीटीव्ही फुटेज पहिले असता अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे दिसून आले.या संदर्भात नागेश कृष्णात बोबडे (वय-४६) यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेंभुर्णीत चोऱ्याचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही.पोलिसांना मात्र अद्याप एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश येत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा