*एकुलता एक मुलाचा तारांचा शॉक बसून शालेय विद्यार्थ्यांचा टेंभुर्णी येथे मृत्यू*
******************************
*मृत्यूस कारणीभूत असणार्यांवरती गुन्हा दाखल करण्याची कुटुंबाची मागणी*
*********************************
टेंभुर्णी येथील टेंभुर्णी- सुर्ली रोडवर राहायला असलेले आतिश इंगळे यांचा मुलगा साईनाथ इंगळे (वय -१० वर्षे ) दहा हा क्रिकेट खेळत असताना बॉल राहूल गडगडे यांचे घराचे गच्चीवर गेला असतां त्या ठिकाणी गच्चीवर चार फुट अंतरावरून गेलेले महावितरण कंपनीचे मेन लाईनचा शॉक बसुन त्यात त्याचा मृत्यु झाल्याने बेकायदेशीरपणे ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना न घेता बांधलेले बांधकाम तातडीने पाडण्याची व साईनाथ याचे मृत्यूस जबाबदार असणारे राहुल गडगडे आणि महेंद्र लोकरे यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आतिश इंगळे यांनी केली आहे.सुर्ली रोडचे आतील भागात महेंद्र बब्रुवान लोकरे व राहुल हीरालाल गड़गडे या व्यक्तीचे बांधकामे आहेत.ते दोन्ही बांधकामे महावितरण कंपनीचे लाइटचे तारांना चिटकुन बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेले आहेत.दोन्ही बांधकामात दोन फुटाचा अंतर आहे.
या दोन्ही बांधकामांना बांधकाम परवाना नसताना बेकायदेशीररित्या महावितरणाचे मेन लाईनला चिटकुन बांधण्यात आलेले आहेत.गच्चीवर गेल्यास लहान मुलांचे हाती लागेल असे महावितरणाचे विद्दुत लाईन गेलेली आहे.त्याला चिटकुन माझ्या मुलाचा मृत्यू झालेला आहे व त्यास वरील दोन्ही लोक कारणीभूत असल्याची तक्रार आतिश इंगळे यांनी केली आहे.
क्रिकेट खेळत असताना बॉल राहुल हीरालाल गड़गडे यांच्या घराच्या टेरेसवर गेला होता. साईनाथ बॉल आणण्यासाठी गड़गडे यांच्या घरावर चढून गेला व बांधकामाला चिटकुन असलेले तारांचा शॉक बसल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. तो पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये ऍडमिट होता.परंतू आठ दिवसांनी त्याची प्राणज्योत मावळली. गड़गडे यांनी घराच्या जागेत गोडाउन केले असल्याने त्या ठिकाणी वरील बाजुस जाण्यासाठीचे जागेवर सेफ्टी डोअर देखील बसवलेले नाही. बेकायदेशीररित्या बांधकाम केलेली आहेत. त्या ठिकाणी यापुढे देखील ताराला चिटकुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदरचे बांधकामे महावितरण कंपनीचे तारांना चिटकुन असल्याने तसेच बेकायदेशीररित्या बांधकाम केल्याने साईनाथचे जिवावर हा प्रसंग बेतला आहे.या प्रकरणी ससून रुग्णालयाचा PM रिपोर्ट पोलिस स्टेशनला पाठविण्यात येणार असल्याचे हॉस्पिटल अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.त्या नंतर योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिस निरिक्षक यांनी सांगितले आहे. संपूर्ण प्रकरणात जबाबदार असणारे महेंद्र बब्रुवान लोकरे व राहुल हिरालाल गड़गडे आहेत
याची दखल घेवून साईनाथचे मृत्युस कारणीभूत असलेले या दोघांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी व त्यांचे बेकायदेशीर बांधकामे पाडण्याची मागणी करण्यात आली आहे.तक्रारीची प्रत पोलिस महासंचालक,पोलिस
अधिक्षक,जिल्हाधिकारी सोलापुर,मुख्यकार्यकरी अधिकारी जिल्हा परिषद सोलापुर,अधिक्षक अभियंता महावितरण कंपनी सोलापुर यांना पाठविण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा