Breaking

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

*संत निरंकारी मंडळाच्या वतीने करमाळयात २२५ जणांचे रक्तदान*



*संत निरंकारी मंडळाच्या वतीने करमाळयात २२५ जणांचे रक्तदान*

*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

    सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन शाखा करमाळाच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन करमाळा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरामध्ये कोविड १९ चे पालन करून एकूण २२५ जणांनी रक्तदान केले.
     या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर झोनचे प्रमुख श्री इंद्रपाल सिंहजी नागपाल महाराज,मा. आमदार  नारायण आबा पाटील, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे चेअरमन  गणेश करे- पाटील , कमलाई साखर कारखान्याचे चेअरमन विक्रम दादा शिंदे, FDL शिक्षण संस्थेचे मा. प्राचार्य श्री. किसनराव धुमाळ सर, विश्वसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जयराज कांबळे . वैद्यकीय अधिकारी श्री. राहुल कोळेकर, जि.प. सदस्या सौ. राणीताई वारे , करमाळा नगरपालिका सभापती सौ स्वाती फंड , रा.स.प. चे तालुकाध्यक्ष  अंगद देवकते, तसेच बाळासो टकले, शंभूराजे जगताप, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अतुल वारे, मोहोळ ब्रँचचे ब्रँचमुखी नामदेव काळे . प्रचारक अनिल पवार सर,कापड व्यापारी डी.एच. सिंधी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने  केले.
सर्व मान्यवरांनी संत निरंकारी मंडळाच्या प्रतिवर्षी होत असलेल्या निष्काम सेवेचे कौतुक केले व काहीनी स्वतःही रक्तदान केले.आतापर्यंत करमाळा शाखेने एकूण 4304 युनिट रक्तसंकलन केले आहे. रक्तसंकलनाचे उत्कृष्ट नियोजन रामभाई शहा रक्तपेढी बार्शी व गोपाबाई दमाणी ब्लड बँक सोलापूर यांनी केले. रक्तदात्यांना प्रेरीत करण्यासाठी गावोगावी साध संगत व प्रबंधकांच्यावतीने जनजागृती करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल शिंदे यांनी केले तर सर्वांचे आभार शाखाप्रमुख  पोपट थोरात यांनी  केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा