*टेंभुर्णी येथील जनता विद्यालयाच्या चेअरमन पदी पांडुरंग सुतार*
टेंभुर्णी प्रतिनिधी दि.7
र्शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी जनता विद्यालयाच्या चेअरमन पदी पांडुरंग सुतार तर सचिव पदी दत्तात्रय यादव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
रविवार दिनांक ७/२/२०२१ रोजी सकाळी अकरा वाजता शिक्षण प्रसारक मंडळ -यशवंतराव विद्यालय टेंभुर्णी या संस्थेची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेमध्ये सन - फेब्रुवारी २०२१ते फेब्रुवारी २०२४ या कालावधी करिता चेअरमन, सेक्रेटरी, स्कूल कमिटी व कार्यकारी मंडळाची निवड पार पडली.
संस्थेच्या चेअरमन पदी पांडुरंग सुतार तर सचिव पदी दत्तात्रय यादव यांची निवड करण्यात आली. तर स्कूल कमिटी सदस्य पदी मुश्ताक शेख , विलासराव देशमुख यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारी मंडळ सदस्य पदी विलास राजमाने, शंतनू उंट, सुभाष मेथा, सुभाष चव्हाण, औदुंबर महामुनी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सर्व नुतन पदाधिकारी यांचा सत्कार माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कार प्रसंगी. बबनदादांनी नवीन पदाधिकारी, संचालक मंडळ व संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पी. डी. भोसले सर यांनी तर नेहरु युवा मंडळ टेंभुर्णी चे शहराध्यक्ष सुर्यकांत पाटील व पंचायत समिती सदस्य वैभव बापू कुटे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. या प्रसंगी शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा