Breaking

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

घोटी सरपंचपदी संजेश वणवे, उपसरपंचपदी राजकुमार साळुंखे



घोटी सरपंचपदी संजेश वणवे, उपसरपंचपदी राजकुमार साळुंखे


सज्जन शिंदे 
बेंबळे प्रतिनिधी:- माढा तालुक्यातील घोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी धोंडोपंतदादा ग्रामविकास आघाडीचे संजेश वणवे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसरपंचपदी राजकुमार साळुंखे यांची निवड  झाली.

 घोटी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२१ मध्ये ११ जागेसाठी झालेल्या तिरंगी लढतीमध्ये धोंडोपंत दादा ग्रामविकास आघाडीने ११ पैकी ०८ उमेदवार युवा नेते राजाभाऊ बागल यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत. घोटी ग्रामपंचायतीत सरपंचपद सर्वसाधरणसाठी आरक्षित असल्याने धोंडोपंतदादा ग्रामविकास आघाडीच्या प्रमुखांनी सर्वानुमते सर्वसाधारण ८ सदस्यांपैकी संजेश वणवे यांचा सरपंचपदासाठी तर राजकुमार साळुंखे उपसरपंचपदासाठी यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. यामुळे संजेश वणवे यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी राजकुमार साळुंखे बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जाधव एस एच व ग्रामसेवक चव्हाण एस. ए. यांनी काम केले. सदरप्रसंगी आघाडीप्रमुख राजाभाऊ बागल यांच्यासह अभिमन्यू काळभोर सर माजी संरपच नागन्नाथ भोसले, ॲड अर्जुन यादव, कालिदास कणसे, शिवाजी (आबा) माळी, जिवराज थिटे,  बापू वणवे, अर्जुन काळभोर, अमीत बागल, अनिल बागल, कैलास कणसे, सुभाष पवार, कुंडलिक भगत, संजय वणवे, हर्षवर्धन कणसे, पवनकुमार गळगुंडे, सचिन वणवे, विलास बागल, अधिकराव पवार, बापू यादव, सुनिल अलाट, संतोष भगत, तानाजी मदने, नितीन अलाट, भजनदास काळभोर, नाना काळभोर, पिंटू माळी, संजय मदने, विजय वणवे, कुलकर्णी काका, जोतीराम गळगुंडे, बाबा जाधव तसेच नुतन ग्रामपंचायत सदस्य माधुरी काळभोर, विजय पवार, कल्याणी यादव, गोजर काळभोर, सारिका जाधव हे उपस्थित होते.

संजेश वणवे व राजकुमार साळुंखे यांची निवड बिनविरोध होताच गावातून फटाक्याची आतिशबाजी व गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा