Breaking

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

मिटकलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिता मिटकल, उपसरपंचपदी रविंद्र श्रीखंडे



मिटकलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिता मिटकल, उपसरपंचपदी रविंद्र श्रीखंडे

सज्जन शिंदे 
बेंबळे प्रतिनिधी:- "आदर्शग्राम" म्हणून राज्यभर नवलौकीक असलेल्या मिटकलवाडी ग्रामपंचायतीच्या जय हनुमान ग्रामविकास आघाडीकडून सरपंचपदासाठी अनिता मिटकल तर उपसरपंचपसाठी रविंद्र श्रीखंडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे  सरपंच व उपसरपंचपदाच्या बिनविरोध निवड जाहीर झाली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून म्हेत्रे व ग्रामसेवक राजेंद्र पखाले यांनी काम केले. आ. बबनदादा शिंदे पुरस्कृत जय हनुमान ग्रामविकास आघाडीने  ७-० असा विजय साकारत मिटकलवाडी ग्रामपंचायतीवर एक हाती विजय मिळवत सत्ता परिवर्तन केले आहे.  यावेळी जय हनुमान ग्रामविकास आघाडीचे जेष्ठ नेते राजाराम दादा मिटकल, आघाडी प्रमुख मा सरपंच मोहन लोकरे, विष्णू मिस्कीन, माणिक मिटकल, नवनाथ सुरवसे, संजय मिटकल, लहू मिस्कीन, सहदेव मिस्कीन, दत्ताभाऊ सलगर  राजू देवकर, बापूराव पराडे तसेच जय हनुमान आघाडीचे सदस्य सतिश मिस्कीन  राणू ठेंगल,वंदना सुरवसे  कविता लोकरे हे उपस्थित होते.

अनिता मिटकल व रविंद्र श्रीखंडे यांची निवड बिनविरोध होताच गावातून फटाक्याची आतिशबाजी व गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा