कोरोना ची साखळी तोडण्यासाठी बेंबळे येथे 1मे ते 10 मे पर्यंत जनता कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करमणार............सरपंच विजय पवार
बेंबळे।प्रतिनिधी
बेंबळे गावात 1 मे ते 10 मे पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती सरपंच विजय पवार व पोलीस पाटील बिभीषण किर्ते यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तांत असा की बेंबळे व परिसरातील आठ ते दहा गावात सध्या कोरोना रोगाने थैमान घातले आहे. अनेक घराघरातून कोरोना चे रुग्ण व त्या प्रकारची लक्षणे असलेले अनेक व्यक्ती दिसून येत एऊ लागले आहेत. कोणीही कसलेही नियम पाळत नाहीत, त्यामुळे बेंबळे, परिते, टेंभुर्णी, कान्हापुरी, जळोली , घोटी, परिते वाडी, हरी नगर, मिटकलवाडी, भोसलेवाडी ,चव्हाणवाडी, माळेगाव या परिसरामध्ये कोरोना चे रुग्ण प्रतिदिनी वाढू लागलेले दिसून येत आहेत. नियमांची सर्वत्र पायमल्ली होत असल्यामुळे कोणाचा पायपोस कोणाशी राहिलेला नाही असं दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना ची साखळी तोडण्याचे कडक नियोजन, करून बेंबळे गाव एक मे ते 10 मे पर्यंत संपूर्ण व्यवहार बंद ठेवून, प्रत्येकाने आपापल्या घरातच राहून, मास्क वापरणे ,सोशल डिस्टन्स पाळणे व स्वच्छता राखणे हे अधिनियम पळून कोरोनाला प्रतिबंध करण्याचा निर्णय कोरना प्रतिबंधक समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यानिमित्त गावातील बाजारपेठा,सर्व किराणा दुकान, कापड दुकाने हॉटेल्स व इतर सर्व प्रकारचे लहानमोठे उद्योगधंदे, फळे भाजीपाला विक्री, तसेच इतर सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवून प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरीच राहावे व सर्वांना सहकार्य करावे असे आव्हान सरपंच विजय पवार यांनी केले आहे. या दहा दिवसांमध्ये फक्त दवाखाने आणि औषध दुकाने चालू राहणार आहेत, त्यामुळे 1 ते 10 मेपर्यंत अतिशय कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे बेंबळे च्या सभोवताली गावात येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी असलेले सात ते आठ रस्त्यावर वाहने व प्रवाशांना कारणाशिवाय येण्या जाण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. यासाठी टेंभुर्णी चे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या सूचनेनुसार बीट अंमलदार हजारे ,पठाण, भोसले हे सर्व पोलीस अधिकारी या संपूर्ण लॉक डाऊन मध्ये रात्रंदिवस सहकार्य देणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करू नये व तसे दिसून आल्यास संबंधित व्यक्तीस तातडीने येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा मध्ये नेऊन त्याची कोवीड टेस्ट घेण्यात येणार आहे व थोडी जरी शंका निर्माण झाल्यास त्या व्यक्तीस टेंभुर्णी किंवा इतर ठिकाणी कोवीड सेंटरमध्ये दहा ते चौदा दिवसाच्या विलगीकरणासाठी सक्तीने पाठवण्यात येणार आहे असे कळविण्यात आले आहे. सध्या बेबळे येथे वीस ते बावीस कोरोना रुग्ण आहेत. तसेच परिते येथे 42 ,मिटकलवाडी 16 , भोसले वाडीत 5 ,व टेम्भूर्णी मध्ये तर80 ते 90 पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे समजते .या दहा दिवसाच्या लॉकडाउन साठी नागरिकांनी सहकार्य करावे व कोरोनाची फैलावत असलेली चेन तोडण्यास सहकार्य करावे अशी विनंती सरपंच विजय पवार, पोलीस पाटील बिबीशन किर्ते, तलाठी दत्तात्रय नरळे,व ग्रामसेवक मधुकर माने आदी मान्यवरांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा