Breaking

शनिवार, १ मे, २०२१

माढा तालुक्यातील गावांना 2515 योजनेतून विविध विकास कामांसाठी 2 कोटी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर - आ.बबनदादा शिंदे


माढा तालुक्यातील गावांना 2515 योजनेतून विविध विकास कामांसाठी 2 कोटी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर -    आ.बबनदादा शिंदे

 

 

माढा विधानसभा मतदारसंघातील माढा तालुक्यामधील गावांतील गावाअंतर्गत मुलभुत सुविधा पुरविणेच्या राज्य सरकारच्या 2515  या योजनेतंर्गत विकासकामे करणे करीता ग्रामीण भागातील कामासाठी 2 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.

 

याबाबत सविस्तर माहीती देताना आ.शिंदे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील प्रमुख गाव अंतर्गत रस्ते  काँक्रीटीकरण करणे, वाड्यावस्त्यांवरील रस्ते काँक्रीटीकरण,खडीकरण व मुरमीकरण करणे  तसेच पेव्हींग ब्लॉक बसविणे, भुयारी गटार  करणे, सामाजिक सभागृह, हायमास्ट दिवा बसविणे या सारखी अनेक  विकासकामांसाठी  शासनाकडे निधी मिळणेसाठी  मागणी केलेली होती. त्यास राज्य शासनाने माढा विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट असलेल्या माढा तालुक्यातील विविध गावच्या  विकास  कामासाठी 2 कोटी 50लाख रूपयांचा निधी मंजूर केलेला आहे. लवकरच ही कामे सुरू होणार आहे.

 

यामध्ये माढा तालुक्यातील पडसाळी - रक्कम रू. 10 लाख, आढेगांव रक्कम रू. 15 लाख, फुटजवळगांव - रक्कम रु. 10 लाख, गारअकोले (पवार वस्ती पट्टी ते नवीन गावठाण रस्ता करणे) रक्कम रु. 10 लाख, वडोली - रक्कम रु. 10 लाख, नगोर्ली  (1) खंडोबा मंदीर ते मोरे वस्ती रस्ता (5 लाख), (2) सार्वजनिक चौक येथे पेव्हींग ब्लॉक बसविणे (5 लाख) अशी एकुण रक्कम रु. 10 लाख, सापटणे (टें) - रक्कम रू. 10 लाख, लऊळ - रक्कम रू. 10 लाख, वडशिंगे - रक्कम रु. 10 लाख, सुलतानपूर - रक्कम रु. 10 लाख, विठ्ठलवाडी - रक्कम रु. 10 लाख, शेवरे  (1) अकलुज रस्ता ते महादेव ढवळे वस्ती रस्ता करणे. (6 लाख), (2) काळे वस्ती ते गायकवाड वस्ती पाणंद रस्ता करणे. (4 लाख) अशी एकुण रक्कम रु. 10 लाख, माळेगांव (मारुती पाटील घर ते लोकरे वस्ती रस्ता करणे) - रक्कम रु. 10 लाख, घोटी (1) घोटी-कान्हापूरी रस्ता ते पाटील वस्ती रस्ता करणे (5 लाख), (2) गाव व वाड्या-वस्त्यांवरील रस्ते करणे. (5 लाख) अशी एकुण रक्कम रु. 10 लाख, तुळशी - रक्कम रु. 10 लाख, अरण - रक्कम रु. 12 लाख, उपळाई (बु) - 1.मारूती मंदीर ते शेंडे स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण करणे, रक्कम रु. 6 लाख,2. उपलाई बु सापटणे रस्ता ते शिंदे वस्ती महादेव माळ रस्ता करणे3 लाख,3. माढा शेटफळ रस्ता ते गायकवाड/दत्ता गोरे वस्ती रस्ता करणे 3 लाख, उपळाई (खु) (1) उपळाई ते चिंचोली रस्ता मजबुतीकरण करणे.(5 लाख), (2) कचरे वस्ती ते शेटफळ जोडरस्ता मजबुतीकरण करणे.(5 लाख) अशी एकुण रक्कम रु. 10 लाख, वाकाव (1) गाव व वाड्या-वस्त्यांवरील रस्ते करणे (5 लाख), (2) वाकाव ते चव्हाणवाडी रस्ता मजबुतीकरण करणे. (5 लाख) अशी एकुण रक्कम रु. 10 लाख, लोंढेवाडी - रक्कम रु. 10 लाख,  जाधववाडी (मो) - रक्कम रु. 10 लाख, बैरागवाडी - रक्कम रु. 10 लाख रुपये, अंजनगांव (उ) 1) उमाटे चौक,कौलगे,दुमाळ ते सुतार गेट,रामोशी गल्ली रस्ता काँक्रीटीकरण करणे (5 लाख), 2) अंजनगांव (उ) ते केवड रस्ता पुल/मोरी बांधणे (5 लाख) 3) जि.प.शाळा ते नवीन ग्रा.प.(पुर्व भाग) भुयारी गटार करणे (5 लाख) अशी एकुण रक्कम रु.15 लाख.याप्रमाणे कामाचा सामावेश आहे. 

 

सदर निधीची तरतुद करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे  सहकार्य मिळाल्याचे सांगून  निधीची प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याने या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून  कामे  सुरू करण्यात येणार असल्याचे आ.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा