Breaking

शनिवार, ८ मे, २०२१

मांडवेच्या तुषारने जपली सामाजिक बांधिलकी*वाढदिवसाचे औचित्य साधून गावासाठी केले २५००० रु



*मांडवेच्या तुषारने जपली सामाजिक बांधिलकी*

वाढदिवसाचे औचित्य साधून गावासाठी केले २५००० रु खर्च
वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

      पुणे जिल्हा वंजारी सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस व खटाव तालुक्यातील मांडवे गावचे सुपुत्र तुषार सोपान खाडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मांडवे व परिसरात सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटकाळात आपणही गावातील नागरिकांसाठी काहीतरी मदत करू शक्यतो या उदात्त हेतूने आपल्या वाढदिवसाच्या होणाऱ्या खर्चाला फाटा देत २५००० रूपये किमतीचे फेस मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. तसेच गावातील आयसोलोशन सेंटरला ही मदत करणार असून कोरोना हद्दपार होईपर्यत मित्रमंडळीच्या वतीने गावाला मदत करणार असल्याचे सांगितले.
         कोरोनाची ही दुसरी लाट असून गावोगावी कोरोनाने कहर केला आहे. अशातच गावातील नागरिकांना चांगल्या पध्दतीचे फेस मास्क, सॅनिटायझर व इतर सुविधा आपणही देऊन एक चांगले कार्य करू शकतो या भावनेतून तुषार खाडे व त्यांच्या मित्रमंडळीच्या वतीने नियोजन करण्यात आले होते. शासनाच्या नियमाचे पालन करून मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. हा उपक्रम राबविण्यासाठी वंजारी सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस आकाश खाडे, विकास खाडे, सागर खाडे, विजय खाडे आदिनी मोलाचे सहकार्य केले.
            तुषार खाडे च्या या उपक्रमाबददल माण- खटावचे आ.जयकुमार गोरे, मांडवेचे जेष्ठ कार्यकर्ते डी.एन.पाटील, खटाव तालुका शिक्षक समितीचे मा. कार्यध्यक्ष उमेश पाटील, सरपंच सागर चंदनशिवे, उपसरपंच विजय खाडे, रमेश पाटील, गणपत खाडे, तुकाराम खाडे, विक्रम खाडे, अशोक देशमुख, शिवाजीराव बर्गे, दिलीप खाडे आदिसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले तर मांडवे परिसरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा