Breaking

शुक्रवार, ७ मे, २०२१

प्रयास ' ने जोपासली सामाजिक बांधिलकी - संदीप मांडवे*


*' प्रयास ' ने जोपासली सामाजिक बांधिलकी - संदीप मांडवे*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम

       खटाव तालुक्यातील सातेवाडी येथे खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदिप मांडवे मित्रमंडळ यांच्या सहकार्याने वडूज येथील जनता गॅरेज कार्यकर्ते व सातेवाडीचे माजी सरपंच हणमंतराव कोळेकर यांच्या माध्यमातून सातेवाडी येथील मधुमाला सांस्कृतिक भवनात उभारलेल्या हुतात्मा स्मृती कोविड विलगीकरण कक्षात रुग्णांसाठी मोफत सुविधा चालू करण्यात आल्या आहेत.
        वडूज येथील प्रयास सामाजिक विकास संस्थेच्या वतीने तेथील रुग्णांना औषधे, फळे, अंडी वाटप करण्यात आले. यावेळी माजी सभापती संदिपदादा मांडवे, प्रयासचे अध्यक्ष डॉ.कुडंलीक मांडवे, उपाध्यक्ष मुन्ना मुल्ला, सदस्य डॉ. प्रविण चव्हाण, रोहित शहा, विशाल भागवत, अक्षय कुंभार, अनिकेत कुंभार, पत्रकार शरदराव कदम, ग्राप सदस्य सचिन बोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. मांडवे म्हणाले, आपल्या या परिसरामध्ये गावोगावी अनेक सामाजिक विकास संस्था आहेत. परंतु वडूज येथील प्रयास सामाजिक संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी समजून कोविड रुग्णांना मदतीचा हात देवून मोलाचे सहकार्य केले आहे. डॉ.कुंडलीक मांडवे यांनी ही संस्थेच्या कार्याचा आढावा सांगून प्रयास सामाजिक विकास संस्था ही जनतेच्या अडीअडचणी वेळी खारीचा वाटा उचलण्याचा नेहमी प्रामाणिक प्रयत्न करीत असून आतापर्यत अनेक सामाजिक उपक्रम संस्थेचे वतीने राबविण्यात आले असून संस्थेचे सर्व सदस्य अशा चांगल्या कामाला नेहमी हातभार लावत असतात.
       या कार्यक्रमास आरोग्य सेविका सौ.गंबरे मॅडम, आशासेविका वंदना बोटे, भुरकवडीचे पोलीस पाटील किरण कदम, युवानेते मनोजदादा कदम, प्रयास सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य, हुतात्मा कोव्हिडमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा