अकलूजचे जेष्ठ पत्रकार प्रसाद जोगळेकर यांचे दुःख निधन
येथील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक प्रसाद जोगळेकर यांचे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले . ते ६० वर्षाचे होते .
साप्ताहिक गावकुसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पत्रकारीतेला सुरुवात केली होती . राज्यातील विविध दैनिकाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले . सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्याची वरदायिनी असलेल्या उजनी पाणी प्रश्नावर त्यांनी आज ( मंगळावर ) सायंकाळी ५ वाजता एक व्हिडिओ वार्तापत्र बनविले . त्यानंतर मित्रांशी गप्पा मारत असतानाच सायंकाळी ५ . २५ वाजता त्यांना अचानक चक्कर आली व ते कोसळले . मित्रांनी त्यांना ताबडतोब अकलूज येथील कार्यालयातून डॉ देवडीकर यांच्या रुग्णालयात नेले परंतु तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली . माळशिरस तालुक्याने एक हरहुन्नरी पत्रकार गमावला असल्याची खंत अनेक मान्यवरांनी व्यक्त केली .
त्यांच्या पश्चात पत्नी ,,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे .
******************************************
*टेंभुर्णी प्रेस क्लबच्या वतीने प्रसाद जोगळेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
टेंभुर्णी प्रेस क्लब चे अध्यक्ष संतोष नाना पाटील, उपाध्यक्ष सतीश काळे, यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी टेंभुर्णी येथे अकलूजचे जेष्ठ पत्रकार प्रसाद जोगळेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी टेंभुर्णी येथील जेष्ठ पत्रकार डी एस गायकवाड, सदाशिव पवार, आबासाहेब साळुंखे, अनिल जगताप, सोपान ढगे, गणेश चौगुले, सुरज देशमुख, सचिन हो दा डे व साप्ताहिक गावकुस चे संपादक विष्णू भाऊ बिचुकले उपस्थित होते यावेळी विष्णू भाऊ बिचुकले म्हणाले की प्रसाद जोगळेकर हे माळशिरस तालुक्यातील लेखणीचे बादशाहो ते अनेक विषयावर ती त्यांनी राजकीय वार्तापत्र असो महाराष्ट्रातील राजकारण असो अनेक त्यांनी लेखातून व साप्ताहिक गावकुस मधून विषय मांडून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल अक्षरशः त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर ती राजकीय टीएमसी पाण्याबद्दल जो विषय बोललीस व सोशल मीडियावर ते प्रसिद्ध झाला तो व्हिडिओ त्यांच्या अखेरचा पत्रकारितेतील विषय ठरला त्यांनी अखेरपर्यंत पत्रकारिता चालून नेहमीच सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले आज प्रसाद जोगळेकर ची कधी ही पोकळी भरून निघणार नाही वसा पत्रकार होणार नाही असे चार शब्दांमध्ये विष्णू भाऊ बिचुकले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा