टेंभुर्णी जिजाऊ ब्रिगेड ने निसर्गाचे सौंदर्य जपत साजरी केली नाविन्यपूर्ण वटपौर्णिमा
जिजाऊ ब्रिगेड टेंभुर्णी, वटपौर्णिमेचे औचित्य साधून इतिहासातील महामानवांच्या महापुरुषांच्या रणरागिनी यांच्या प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार अंगीकारून एक पाऊल परिवर्तनाकडे टाकत साजरी केली आगळीवेगळी वटपौर्णिमा
वडाच्या सावित्रीला फेऱ्या मारण्यापेक्षा एका सजीव झाडाला धाग्यामध्ये जखडून ठेवण्यापेक्षा फुले यांच्या सावित्री माईला वैचारिक दृष्ट्या पुजले गेले तर विचारांची क्रांती होईल हाच अनमोल विचार घेऊन आज प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभुर्णी येथे वडाचे झाड लावण्यात आले वडाचे झाड हे आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे मानले गेले आहे आणि म्हणूनच आरोग्य केंद्राच्या अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न राहून कृत्रिम प्राणवायू पेक्षा नैसर्गिक प्राणवायू वाढेल याच दृष्टिकोनातून वडाचे झाड लावण्यात आले त्याच बरोबर शोभेची झाडे व कुंड्या भेट देण्यात आल्या... जिजाऊ ब्रिगेड चा एकच उद्देश आहे...
कोणत्याही सणाला विरोध नाही तर त्यामागे बुरसटलेल्या विचारांना चालीरीतींना वेळीच विरोध करणे योग्य गरज समजणे ठामपणे समजून सांगणे ही प्रत्येक महिलेची जबाबदारी आहे, अज्ञानातून ज्ञानाकडे जाऊन या विचारांना खतपाणी न घालता वेळीच विरोध करून प्रथम स्वतःमध्ये बदल करून जिजाऊची हरेक लेक विचाराने मनाने आणि आर्थिक दृष्ट्या खंबीर आणि सक्षम व्हावी यासाठी जिजाऊ ब्रिगेड नेहमीच प्रयत्नशील असेल
एक तरी झाड लावूया पर्यावरणाचा समतोल साधू या निसर्गाचे सौंदर्य वाढवून हा अनमोल ठेवा पुढच्या पिढीसाठी जतन करून असा संकल्प करत झाडां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली
यावेळी उपस्थित जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्षा, शिवमती सुरजा ताई बोबडे, शहराध्यक्ष शिवमती धनश्री ढवळे, उपाध्यक्ष शिवमती पल्लवी गायकवाड, सचिव शिवमती संजीवनी आरबोळे, सहसचिव शिवमती आशा निमसे, संघटक शिवमती सुवरणा देशमुख शिवमती स्वाती साखरे शिवमती सारिका शिखरे शिवमती वंदना चौधरी शिवमती विद्याताई देशमुख, जनरल प्रवक्ता शिवमती अर्चना पांडे कर, वैद्यकीय प्रवक्त्या शिवमती अश्विनी ढवळे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रांत रेळेकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रणिता खोटे तसेच आशा सचिव वनिता सरवदे उपस्थित होते,
जय जिजाऊ जय सावित्री
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा