Breaking

गुरुवार, १ जुलै, २०२१

युथ विथ मिशन या संस्थेच्या माध्यमातुन ग्रामीण हॉस्पिटलला वैद्यकिय औषधांची मदत....


युथ विथ मिशन या संस्थेच्या माध्यमातुन ग्रामीण हॉस्पिटलला  वैद्यकिय औषधांची मदत....

श्रीगोंदा - नितीन रोही,
मुंबई येथील १९८४ साली स्थापन झालेली युथ विथ मिशन या संस्थेच्या माध्यमातुन नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सरकारी दवाखान्यात वैद्यकिय औषधांची मदत पोहोच.
     अहमदनगर येथील बुथ हॉस्पीटलमध्ये युथ विथ मिशन संस्थेने औषधांची मोठ्या प्रमाणात मदत दिली. हे पाहुन श्रीगोंद्यातील नगरसेवक सुधीर खेडकर यांचे बंधु अमोल पांडुरंग खेडकर यांनी या संस्थेशी संपर्क करुन श्रीगोंदा शहरातील ग्रामीण रुग्णालयात मदतीची गरज असल्याचे फोनवरुन सांगितले. त्यानंतर आज सकाळी ही टिम आढळगाव येथे जाण्याअगोदर या संस्थेच्या टिमने ग्रामीण रुग्णालयात मदत पोहोच केली.
      कोविड काळात गरीब गरजुंना किराणा मालाचे वाटप करणे, मदत देणे, जेवण देणे याचबरोबर इतर ही मदत ही संस्था टिमच्या माध्यमातुन पुरवित आहे. अनेक सरकारी दवाखान्यात औषधांची कमतरता भासत असते. यामुळे गरीब नागरिक यांना औषधोपचार मिळण्यास विलंब लागतो. डॉक्टर्स हतबल होतात. ही गोष्ट युथ विथ मिशन या संस्थेच्या लक्षात येताच कामाला लागली. मुंबई येथेही मोठ्याप्रमाणावर मदत दिलीच परंतु अहमदनगर शहराबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्याबरोबर श्रीगोंदा, जामखेड तालुक्यात सुध्दा मदत दिलेली आहे.
     या टिम मध्ये अनिल लष्कर, जॉन्सन, राज, भगवान राऊत, ऋषिकेश राऊत ही मंडळी मोठ्या हिरारीने काम करत आहे.
      औषधे देते प्रसंगी सुत्रसंचालन दत्ताजी जगताप यांनी केले तर आभार डॉ.नितीन खामकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. संघर्ष राजुळे, डॉ.नितीन खामकर, बाबासाहेब पंडीत याच बरोबर उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, मा.उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, सुधीर खेडकर, संग्राम घोडके, संतोष क्षिरसागर, महावीर पटवा, अंबादास औटी, दक्षचे अध्यक्ष दत्ताजी जगताप, दिपक शिंदे व पांडुरंग खेडकर,,मयूर बनसुडे,गणेश अस्वर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा