Breaking

बुधवार, १४ जुलै, २०२१

चव्हाणवाडी ते केवड फाटा रस्ता डांबरीकरणाचा रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ


चव्हाणवाडी ते केवड फाटा रस्ता डांबरीकरणाचा रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

माढा / प्रतिनिधी- माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गटातील चव्हाणवाडी ते केवड फाटा या 3 किमी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणातून होणार असून या करिता दीड कोटी निधी आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजुर झाला असून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी रणजितसिंह शिंदे म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी होती त्याची पुर्तता यानिमित्ताने होणार असून ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकरी व वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे.मानेगाव गटातील विविध गावांतील विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून उपलब्ध केला असून भविष्यातही या भागातील विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सोसायटीचे सचिव आण्णासाहेब चव्हाण, विठ्ठल माने, महेश चव्हाण,विकास भांगे,मनोहर चव्हाण,नागनाथ टिपे, मारुती चव्हाण,कुंडलिक गोसावी, अंकुश चव्हाण,बापूसाहेब चव्हाण, दादा चव्हाण,दत्ता चव्हाण,माऊली चव्हाण,गणेश चव्हाण,अजिनाथ चव्हाण,युवराज चव्हाण,महेश घोरपडे,अरुण चव्हाण,आण्णा गोसावी यांच्यासह ग्रामस्थ व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी- चव्हाणवाडी ते केवड फाटा ता.माढा रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ करताना जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे,आण्णासाहेब चव्हाण व इतर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा