Breaking

रविवार, २५ जुलै, २०२१

श्रीगोंदा तालुक्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान....




श्रीगोंदा तालुक्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान....

श्रीगोंदा-नितीन रोही,

हिंदुह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना वाढीसाठी संपर्कप्रमुख , जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे . त्याप्रमाणे श्रीगोंदा तालुक्याचे तालुका प्रमुख बाळू दुतारे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणात शिवसंपर्क अभियान राबविण्याचा मानस त्यांनी ठेवला आहे. तालुक्यातील मढेवडगाव या गावामध्ये शिव संपर्क अभियान घेण्यात येत आहे. यावेळी 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या धर्तीवर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे काम करीत आहेत ते जनतेपर्यंत पोहोचण्याचा दुतारे हे प्रयत्न करीत आहेत शिवसैनिकांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेत आहेत, आपलं सरकार आहे गावकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न ते या शिव संपर्क अभियानाच्या मार्फत करीत आहेत विद्यार्थ्यांची प्रश्न असो युरिया तुटवडा असेल जादा दराने विक्री असेल अनेक प्रश्नावर चर्चा विचारविनिमय केला शिवसैनिक युवा सैनिक यांच्या भावना दुतारे हे स्वत:जाणून घेत आहेत. यावेळी  उपस्थित तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे, युवा सेना तालुका प्रमुख हरिभाऊ काळे,मा शिवसेना शहर प्रमुख सुरेश देशमुख,युवा सेना शहर प्रमुख ओमकार शिंदे,युवा सेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख कृष्ण भालेराव,शिवसैनिक जयराज गोरे व सर्व शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शिवसैनिक निलेश गोरे, शुभम गोरे,स्वप्नील गोरे,पवन गोरे,विशाल गोरे,तुषार गोरे,स्वप्नील जाधव,सुहास शिंदे, वैभव गोरे,ऋषिकेश खेतमाळीस यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा