Breaking

सोमवार, १९ जुलै, २०२१

गरिबीवर मात करून प्रथमेश ममदेचे दहावीत यश*



*गरिबीवर मात करून प्रथमेश ममदेचे दहावीत यश*
(सुरज अंगुले) दि.१८. सोलापूर,निलम नगर भागातील नेताजी सुभाष चंद्र बोस हायस्कूल मधील विद्यार्थी कु. प्रथमेश राजेंद्र ममदे याची परिस्थिती हालाखीची व जेमतेम असतानासुद्धा ७० टक्के गुण घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे त्याचे वडील अपंग व आई गृहिणी असून दोघांनाही मदत करत करत हे घवघवीत यश संपादित केलं आहे. यापुढेही गरिबीवर मात करण्यासाठी प्रामाणिक व कठोर परिश्रम घेऊन मी माझ्या आई-वडिलांना आधार देईन असे त्यांनी यावेळी सांगितलं. या यशाबद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आई-वडील आणि नातेवाईकांनी अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील शैक्षणिक कार्यास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा