*युवक व जेष्ठ तेली समाज संघटनेची उस्मानाबाद जिल्हयाची कार्यकारणी जाहिर*
अखिल भारतीय तैलिक साहू महासभा नवी दिल्ली यांच्या अतंर्गत महाराष्ट्र प्रांतिक तेली सभा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षिरसागर,महाराष्ट्र प्रांतिक तेली सभेचे अध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांच्या आदेशाने उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली.प्रदेश कार्यकारणी सदस्य लक्ष्मण निर्मळे,उस्मानाबाद युवक जिल्हाध्यक्ष पदि शशिकांत बेगमपुरे,तर जेष्ठ आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदि चंद्रकांत मेंगले,तर जेष्ठ उस्मानाबाद शहराध्यक्ष पदि शिवलिंग होनखांबे,उस्मानाबाद युवक शहराध्यक्ष जितेंद्र घोडके,युवक शहर सचिव गणेश घोडके,युवक जिल्हा सचिव संतोष क्षिरसागर,नागेश निर्मळे,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचे तेली समाज संघटनेचे युवक उपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्या हस्ते निवडीचे नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी तेली समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके,जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दत्तात्रय बेगमपुरे,दिपक नाईक आदिंची उपस्थिती होती.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा