*क्रांती साहित्य विचार मंच समूहाला शुभेच्छांचा वर्षाव*
समूहप्रशक/नियोजक समिती
सुरज अंगुले,श्रीम.संध्याराणी कोल्हे,सौ.निशा खापरे
महाराष्ट्रात क्रांती साहित्य विचार मंच समूह अव्वल स्थानी असल्यामुळे चित्रपट अभिनेते सोमनाथ तडवळकर यांनी आपल्या बोलीभाषेतून शुभेच्छा संदेश देऊन त्यांना प्रोत्साहन व अभिनंदन केले आहेत. हा समूह गेली तीन वर्ष सतत साहित्य क्षेत्रात विविध उपक्रम,स्पर्धा, चारोळ्या,विचार मंथन असे अनेक ऑनलाईन स्पर्धा आयोजित करत असतात. या समूहाला उत्तम साथ नागपूरच्या कवयत्री सौ.निशा खापरे यांनी मोलाच सहकार्य करून फुले,शाहू,आंबेडकरांचा वारसा कायमस्वरूपी जपत आहेत. एक जळजळीत वास्तव मांडणाऱ्या लेखिका आहेत. त्याचबरोबर कळंबच्या शिक्षिका तथा षटकोळी निर्मितीकार श्रीम. संध्याराणी कोल्हे यांनी समूहात आयोजन केलेल्या स्पर्धेचं परीक्षक म्हणून निस्वार्थ कार्य करीत आहेत. सर्व सदस्यांना मार्गदर्शन करून साहित्य क्षेत्रात परिपक्व करण्याचं काम हाती घेतलं आहे. विविध प्रकारचे काव्य त्यांनी शिकून इतरांना तरबेज करण्याचा हातखंडा आहे. म्हणून त्यांना शब्दप्रभू या नावाने महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे. क्रांती साहित्य विचार मंच समूहाचे संस्थापक समूह प्रशासक चौफेर कवी सुरज अंगुले निशा खापरे आणि श्रीमती संध्याराणी कोल्हे समूह प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. दोन्ही कवित्रीची उत्तम साथ लाभल्याने या समूहाचा कारभार सुरळीत चालू असतो. सूत्रसंचालन करणाऱ्या आर्या तुळजापूरकर यांनी या समूहाचं तोंडभरून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. यवतमाळच्या नवलेखिका प्रतीक्षा मांडवकर यांनी शुभेच्छा संदेश चित्रफित करून सर्व सदस्यांचा आनंद द्विगुणीत केला आहे. मराठवाडा जिल्हा प्रतिनिधी सौ. संगीता काळे (मराठवाडा साथी) यांनी आपल्या मधुर वाणीतून या समूहाच्या तिन्ही सदस्यांचं कौतुक करून साहित्य क्षेत्रात आपण एक आगळेवेगळे व्यासपीठ निर्माण करून विचार आदान-प्रदान करण्याचं सुलभ माध्यम म्हणजे क्रांती साहित्य विचारमंच समूह आहे. कोणतही कार्य करीत असताना प्रामाणिक व कठोर परिश्रम करून केल्यास यश नक्की मिळतं असं त्यांनी शुभेच्छा संदेशात मोलाचा सल्ला दिला आहे. समूह प्रशासक चौफेर कवी सुरज अंगुले यांनी सर्वांचे आभार मानून अधिक जोमाने कार्य करत राहतो असे त्यांनी यावेळी सांगितले. या समूहाला माझे स्नेही मित्र पत्रकार मेघराज किलजे आणि दिनेश सलगरे वेळोवेळी सहकार्य केलं आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा