Breaking

बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावने आणि महिलांना अर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हि सामूहिक जबाबदारी आमची* - *आ. अविराज गवळी**"स्टेट बँक ऑफ इंडिया व उमेद अभियानाच्या माध्यमातून उदगीर येथे बचत गट कर्ज मंजुरी मेळावा संपन्न"**सदरील बँक मेळाव्यात एका दिवसात 101 बचत गटांना 1 कोटी 82 लाख रुपयांचे कर्ज वाटप...........*



*ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावने आणि महिलांना अर्थिक   दृष्ट्या  सक्षम करणे हि सामूहिक जबाबदारी आमची*  - *आ. अविराज गवळी*
*"स्टेट बँक ऑफ इंडिया व उमेद अभियानाच्या माध्यमातून उदगीर येथे बचत गट कर्ज मंजुरी मेळावा संपन्न"*
*सदरील बँक मेळाव्यात एका दिवसात 101 बचत गटांना 1 कोटी 82 लाख रुपयांचे कर्ज वाटप...........*


*उदगीर* (लातूर) दिनांक 24 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती उदगीर व स्टेट बँक ऑफ इंडिया उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वंससहाय्यता समूहांना बँक कर्ज मंजुरी व वाटप मेळावा" संपन्न झाला सदरील मेळाव्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेन रोड उदगीर, करडखेल, लोहारा, मोंढा रोड उदगीर या चारही शाखेच्या वतीने आजच्या मेळाव्यात 101 गटांना 1 कोटी 82 लाख कर्ज मंजूर करून मान्यवरांच्या हस्ते गटांना मंजुरी पत्र देण्यात आले सदरील मेळाव्यात आ.जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री देवकुमार कांबळे सर यांनी मार्गदर्शन करत असताना या कर्जाचा विनीयोग महिलांना उपजिवीका निर्मितीसाठीच करावा असे संबोधीत केले तर आ.अविराज गवळी सर, शाखा धिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया मेन रोड उदगीर यांनी सदरील कर्ज महिलांनी नियमीत परतफेड करावे जेणेकरून पुढच्या वेळेस बँकेला दुप्पट कर्ज देता येईल असा सल्ला त्यांच्या मार्गदर्शनातुन त्यांना उपस्थित महिलांना दिला व  ग्रामीण भागातील महिलांचा अर्थिक स्तर उंचावने व महिलांना अर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हि   आमची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत अविराज गवळी  यांनी व्यक्त केले, सदरील कार्यक्रमासाठी आ. श्री सुशांत सावडीकर, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया करडखेल, आ. श्री वैभव गुराळे सर,जिल्हा व्यवस्थापक, आ.श्री शिंदे सर स्टेट बँक ऑफ इंडिया लोहारा , तसेच स्वप्निल जाधव सर  व जीवन भोसले  हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री श्रीकांत श्रीमंगले, तालुका अभियान व्यवस्थापक यांनी केले तर आभार श्री संतोष भुताळे यांनी मांडले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री धनाजी भोसले,श्री प्रशांत मेदगे,श्री संजय गोवंदे ,श्री लहु पोलपुट्टे, श्रीमती शामल उलीगडे,श्री अंगद हातागळे, श्री विनोद बागदे,श्री प्रविण राठोड,प्रेरीका भाग्यश्री बिरादार, विजयमाला पवार, करूणा कांबळे, शोभा कसबे, संगीता कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा