Breaking

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

शिवणी वनविकास महामंडळाच्या फिरत्या पथकाकडून अवैध सागवान सह तीन लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त* ---------------------------------------------------------- *शिवणी,जलधारा,वनविकास महामंडळ व फिरते पथकाच्या वतीने संयुक्त सागवान तस्करांवर मोठी कार्यवाही टेम्पो सह चालक ताब्यात*



*शिवणी वनविकास महामंडळाच्या फिरत्या पथकाकडून अवैध सागवान सह तीन लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त*                                                              ----------------------------------------------------------  *शिवणी,जलधारा,वनविकास महामंडळ व फिरते पथकाच्या वतीने संयुक्त सागवान तस्करांवर मोठी कार्यवाही टेम्पो सह चालक ताब्यात*


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात मोठ्या प्रमाणात वनविकास महामंडळ व वनविभागाचे राखीव जंगल जवळ जवळ चार हजार हेक्टर आहे. या जंगलातून मौल्यवान सागवानासह इतर अवैध वृक्षतोड मागील काही दिवसात  पहावयास मिळाले होते. त्यामुळे या भागातील वनवैभव धोक्यात आल्याचे चित्र अनेकदा  पहावयास मिळाले होते.मागील काही दिवसाखाली सागवान तस्करानी मौल्यवान सगवणाची कत्तल करत वनविकास महामंडळाच्या विभागाला जणू आव्हानच केल्यासारखे दिसून आल्याने काही दिवसांपासून शिवणी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगलात वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एस.पटवेकर यांनी  रात्रीची गस्त  करण्यास कर्मचारी व स्वतः पुढाकार घेऊन गस्ती साठी जोर लावून धरल्याने काल दि.२२ आगस्ट  रोजी रात्री  च्या   अडीच वाजेच्या दरम्यान शिवणी व जलधरा वनपरिक्षेत्र कार्यालय फिरत्या पथकाकडून कक्ष क्रमांक २७१ दयाल धानोरा  बीटमध्ये जंगलात गस्त घालत असताना रात्रीला त्यांना झाडे तोडण्याचा आवाज येत असल्याने त्या आवाजाच्या दिशेने गेले असताना त्यांना त्या ठिकाणी बारा जिवंत सागवान तोड करून आयचर टेम्पोमध्ये मौल्यवान  सागवान भरत असल्याचा  अवस्थेत दिसून आले त्या टेम्पो जवळ त्यांना टेम्पो चालक बाळू शंकर घोगरे रा. इचोडा वय ४०  (तेलंगणा ) आढळून आल्याने त्या टेम्पो चालकांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. १२ सागवान  झाडे तोडून आयचर टेम्पो मध्ये भरण्याचा  नादात असलेल्या लाकूड तस्कर मागून कोणीतरी आलेली चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन तस्कर फरार होण्यास सफल झाले शिवणी येथील वनविकास महामंडळाच्या ताब्यातल्या क्रमांक २७१ धानोरा बीट मध्ये टेम्पो क्रमांक ए.पी. २१ टी.डब्लू. ७९८० हा क्रमांकाचा टेम्पो लाकडाने भरलेल्या अवस्थेत जप्त करण्यात आला टेम्पो जप्त करण्यात येऊन आरोपी टेम्पो चालक बाळू शंकर घोगरे  आरोपीला अटक करून त्या आरोपीला शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन त्या आरोपीची प्रार्थमिक तपासणी  करून  पुढील कारवाईसाठी किनवट येथे नेण्यात आले.यात मौल्यवान सागवान सह टेम्पो वनविकास महामंडळ यांनी अंदाजे तीन लाख साठ हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात यश  आले आहे.आशा या धाडसी कार्यवाही मुळे मराठवाडा व  तेलंगाणा सीमेलगत असलेल्या सागवान तस्करांचे धाबे दणाणले असून या झालेल्या कार्यवाहिस   विभागीय व्यवस्थापक एस.जि शंभरकर, सहा व्यवस्थापक जे.डी. पराड, शिवणी वनपरिक्षेत्र अधिकारी जि.एस.पटवेकर वनपाल गावंडे,वनरक्षक बि.एस.वडजे,के.पि.केंद्रे.एल.जी. हंपले.सह फिरत्या पथकातले कर्मचारी आर.एस. दहिफळे ,एम. एम .शेख ,चालक ए.आर. सिरशे,वनमजुर धोंडीबा हेकाळे. श्रावण आंबेकर ,नागोराव मेडके ,शेख नजीर, रोजगार राजेंद्र भाड ,इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.तर यात मागील अवैध सागवान तस्कर केलेल्या घटनांत या तस्करांचे धागे दोरे आहेत की काय आशा दिशेने सुद्धा चौकशी ची कार्यवाही होईल असे शिवणी वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी जी. एस.पटवेकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा