Breaking

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत, तुळजापूर येथील पुजारी बांधव , व लहान-मोठे व्यापारी यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन*




*राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत, तुळजापूर येथील पुजारी बांधव , व लहान-मोठे व्यापारी यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन*

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कोरोना च्या संकटामुळे राज्यामध्ये सर्वत्र लॉकडाऊन होतं परंतु आता रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे व राज्यातील रिकव्हरी रेट 96 पर्यंत गेल्यामुळे राज्यात आता पंचवीस जिल्ह्यांमध्ये ऑनलॉक केलेला आहे़. सध्या सर्वत्र नागरिकांचा मुक्त संचार होताना दिसतोय सर्व दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. राज्यातील जिम चालू एसटी महामंडळाच्या बसेस शंभर टक्के क्षमतेने सुरू सरकारी व खाजगी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू रेस्टॉरंट बियर बार दारू दुकाने सुरू परंतु राज्यातील सर्व प्रार्थना स्थळे मात्र बंद असे का .अशा प्रकारचा भेदभाव करणे योग्य नाही महोदय आम्ही आई तुळजाभवानीच्या तुळजापूर चे रहिवासी असून गेल्या वर्षीपासून राज्यामध्ये लॉकडाउन पडलेला आहे पहिला लॉकडाउन उठल्यानंतर केवळ तीन महिने ऑनलाईन परिस्थिती राहिली त्यानंतर आणखी लॉकडाउन पडला .महोदय तुळजापूर हे  गाव पूर्णपणे मंदिरा वर अवलंबून असून या ठिकाणी कुठलीही औद्योगिक वसाहत (m.i.d.c) नाही मोठे उद्योग धंदे नाहीत.त्यामुळे येथील सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचा उदरनिर्वाह मंदिरावर अवलंबून असून मंदिर बंद असल्या कारणाने तुळजापूर येथील पुजारी बांधव लहान मोठे व्यापारी यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी कृपा करून आपण ज्याप्रकारे इतर गोष्टीमध्ये टप्प्याटप्प्याने ऑनलॉक करत आहात त्याच पद्धतीने मंदिरामध्ये प्रवेशाच देखील एक धोरण आखाव सर्वप्रथम लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मंदिरामध्ये प्रवेश देण्यात यावा.त्यामुळे तुळजापूर येथील नागरिकांचा उदरनिर्वाह सुरू होईल. जर का आपण राज्यसरकारने येणाऱ्या 20 तारखेपर्यंत धार्मिक स्थळे  उघडण्याचा निर्णय नाही तर नाहीतर मंदिरावर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या पुजारी बांधव व छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करावं वरील निर्णय 20 ऑगस्टपर्यंत न घेतल्यास घेतल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येईल. तरी मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या मागणीचा गांभीर्याने विचारपूर्वक निर्णय घ्यावा  ही आपणास नम्र विनंती.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा