Breaking

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना खिलारी बैलांची भुरळ*



*पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना खिलारी बैलांची भुरळ*

वडूज  प्रतिनिधी / शरद कदम

         अंबवडे ता. खटाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नुतन इमारतीच्या सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सदर इमारतीच्या सुशोभीकरणाचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.खटाव तालुक्यामध्ये सर्वात जास्त नफ्यात असणारी सोसायटी म्हणून अंबवडे गावची ओळख आहे. या सोसायटीच्या आर्दश कामकाजबद्द्ल सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
            या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रकाश नलवडे यांच्या फार्म हाऊसला नामदार बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली. यावेळी पालकमंत्री यांना प्रकाश नलवडे यांच्या घरासमोरील गोठ्यात खिलारी बैल जोडी गोठ्यात दिसताच बैल जोडीच्या दिशेने जाण्याचा मोह आवरला नाही. बाळासाहेब पाटील यांनी बैल जोडी बाबत प्रकाश नलवडे यांच्या कडुन बैल जोडीची विचारपुस करुन नलवडे यांचे कौतुक केले. या पुर्वीच्या काळात बहुतांशी गावामध्ये गावामध्ये खिलारी गाय बैल मोठ्या प्रमाणावर असत परंतु अलिकडच्या काळात शेतीची मशागत ट्रक्टरच्या साह्यायाने केली जाते. त्यामुळे खिलारी जातीचे गाय बैल सहजा शेतकऱ्यांकडे पहावयास मिळत नाहीत. परंतु खटाव ताल्क्यातील अंबवडे येथील प्रकाश नलवडे शेठ यांना शेती बरोबरच खिलारी गाय - बैल पाळण्याची मोठी हौस आहे. आजही त्याच्या गोठ्यात दोन खिल्लारी बैल जोडी आहेत त्यांची जपणुक अत्यंत व्यवस्थित पणाने होत आहे. हे पाहुन नामदार बाळासाहेब पाटील यांनी समाधान व्यक्त केले. शेती ही सध्या आधुनिक पध्दतीचा अवलंब करुन शेतकरी ट्रक्टरच्या साह्याने शेती करण्यास अधिक पसंती देत असताना नलवडे यांनी खिलारी बैल जोडी पाळल्याने पाटील साहेबांनी नलवडे यांचे कौतुक केले. यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या मध्ये नामदार बाळासाहेब पाटील यांचे खिलारी बैल जोडीची असलेली आवडीबाबत चर्चा ऐकायला मिळाली व पाटील साहेबांना शेतीची असलेली आवड व शेतीसाठी ग्रामीण भागात शेतकरी बैलाचा वापर करत असलेल्या बैलांची पाटील साहेबांना जणु भुरळच पडली. 
         या कार्यक्रमास माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, मा.आमदार प्रभाकर घार्गे साहेब यांच्या पत्नी इंदिराताई घार्गे, मा. जिल्हा परिषद सदस्य जितेंद्रदादा पवार, जिल्हा नियोजन मंडळाचे मा. सदस्य नंदकुमार मोरे, मा.सभापती संदिप मांडवे, सौ. बाबर मॅडम, येरळा परिवार अध्यक्ष धनंजय क्षीरसागर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा आशाताई बरकडे, सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, सदस्य, लोणी चे युवा नेते ज्ञानेश्वर शिंदे, भोसरे चे मा. सरपंच नितीन जाधव, म्हासुर्णे ग्रा.प.सदस्य तुषार माने, ज्ञानेश्वर इंगवले, गुरसाळेचे उपसरपंच रोहन जाधव, सदस्य सागर झेंडे, तसेच अंबवडेतील सर्व जेष्ठ नागरिक व युवक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा