Breaking

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

मातंग एकता समाज व नवनिर्माण सेनेचा नगरपरिषदेवर २४ सप्टेंबर रोजी संडास बकेटसह हालगी मोर्चा...* *AJ24 तास न्यूज बुलेटिनच्या दणक्याने न.पा.आरोग्य खातेची सफाई मोहीम सुरू...* *महिला संडास केंव्हाही ढासळण्याच्या अवस्थेत... प्रांत अधिका-यांना निवेदन* प्रांत अधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देताना पदाधिकारी...



*मातंग एकता समाज व नवनिर्माण सेनेचा नगरपरिषदेवर  २४ सप्टेंबर रोजी संडास बकेटसह हालगी मोर्चा...*


    *AJ24 तास न्यूज बुलेटिनच्या दणक्याने न.पा.आरोग्य खातेची सफाई मोहीम सुरू...*

    *महिला संडास केंव्हाही ढासळण्याच्या अवस्थेत... प्रांत अधिका-यांना निवेदन*
 प्रांत अधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देताना पदाधिकारी...



: कुर्डूवाडी प्रतिनिधी/मातंग एकता आंदोलन माढा तालुका आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा नेहरू नगर कुर्डुवाडी,
आजचे कुर्डूवाडी शहरातील नेहरू नगर परिसरातील अत्यंत वाईट परिस्थिती  अशी वाईट परिस्थिती आज कुर्डूवाडी नगर परिषदेच्या माध्यमातून आज मातंग एकता आंदोलन सामाजिक संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दाखवण्यात आले आहे परिसरामध्ये नाले मोठ्या प्रमाणात तुंबलेले आहेत महिला शौचालय याची मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झालेली आहे महिला शौचालय ची सेफ्टी टँक धोकादायक असून अपघात झाल्यास याला जबाबदार कोण .... ???
तसेच परिसरात घान वास मोठ्या प्रमाणे मध्ये पसरलेला आहे अशा या घाणीचे साम्राज्य मध्ये नेहरूनगर मधील नागरिक राहत आहेत त्यांच्या आरोग्याचा / जिवीताचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा परिस्थितीत नेहरू नगर मध्ये दलित वस्ती सुधारणा अतंर्गत कामे फक्त कागदावरच केली जातात का...? या प्रकरणी प्रांताधिकारी मेडम व  नगरपालिका कुर्डुवाडी यांना निवेदन दिले आहे, कुर्डुवाडी न.पा चे बांधकाम विभाग चे इंजिनिअर श्री शुभम शिंदे यांनी समक्ष येवून पाहणी केली व न.पा कडे निधी नाही असे उडवा उडवी ची उत्तरे दिली, या मुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा नेहरू नगर कुर्डुवाडी व कुर्डुवाडी शहर यांच्या वतीने कुर्डुवाडी न.पा वरती महिला हातात संडास ची बकेट घेऊन शुक्रवार दिनांक 24-09-2021 रोजी हलगी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या वेळी मा. रोहित कांबळे ( मातंग एकता आंदोलन माढा तालुकाध्यक्ष), मा. आकाश लांडे ( विधानसभा अध्यक्ष करमाळा-माढा) , मा. अमन कांबळे ( मातंग एकता आंदोलन कुर्डुवाडी शहराध्यक्ष) , मा. ओंकार चौधरी (कुर्डुवाडी शहराध्यक्ष) , मा. राजेंद्र भिसे ( वाहतूक सेना कुर्डुवाडी शहराध्यक्ष) मा. गणेश खिलारे ( नेहरू नगर कुर्डुवाडी शाखा अध्यक्ष) , मा. अमोल घोडके ( नेहरू नगर मार्गदर्शक) तसेच सचिन कांबळे, संदीप मोरे, आशिष अरसुले, अकाश भालके, सिताराम खिलारे, अजय खिलारे , सुधीर कांबळे, मंगेश खिलारे, विजय कांबळे, आनंद खिलारे, सुरज अस्वरे, विशाल कांबळे तसेच नेहरू नगर मधील नागरिक समस्या घेऊन उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा