लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तुळजापूरात रास्तारोको आंदोलन ; विविध ठिकाणच्या घटनेचा केला निषेध.
तुळजापूरः ता.९
अन्याय अत्याचार विरोधात मातंग समाज आक्रमक - संबंधित दोषी पोलीस प्रशासन,महसूल अधिकारी आणि गावगुंड,समाजकंटक,देशद्रोही यांचेवर तात्काळ कडक कारवाई करा..
....................................................
मातंग समाजावर सतत होत असलेले अन्याय अत्याचार तसेच गऊळ ता.कंधार जि.नांदेड येथील साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याची समाजकंटकानी केलेली तोडफोफ व जातीयवादी समाजकंटकास साथ देणारे पोलीस प्रशासन यानीं मातंग समाजावर केलेला लाठीचार्ज याचा निषेध करत नियोजित ठिकाणी तात्काळ आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करावा, बोरगाव ता.माळशिरस जि.सोलापूर येथे मयत मातंग व्यक्ती चे प्रेताची हेळसांड/स्मशानभूमीत अंत्यविधी स झालेला गावगुंडाकडून विरोध,येवती ता.
तुळजापूर जि.उस्मानाबाद येथे मातंग अल्पवयीन मुलीवर सवर्णाकडून झालेला अत्याचार, सास्तुर ता.लोहारा येथे मातंग युवकाचा जाणीवपुर्वक विध्युत पोलवर चढवून ग्रामपंचायत ने केलेला खून,गोवर्धनवाडी ता.जि.
उस्मानाबाद येथे आण्णाभाऊ साठे जयंतीचा दिनी लावलेला पोस्टर्स फाडून स्मशानात फेकणारे मातेफीरु यांचेवर कठोर कारवाई करावी,काक्रंबा ता.
तुळजापूर येथील मातंग युवकाचा खून करणाऱ्या गुन्हेगारास फाशी द्यावी,
त्याचबरोबर अंबेजोगाई येथे मातंग महिलेलवर अतिप्रसंग कराणाऱ्या गावगुंड,समाजकंटकाला तात्काळ
फाशीची शिक्षा द्यावी.आदी मागण्या घेऊन श्रीमती नगीनाताई सोमनाथ कांबळे यांचे नेतृत्वाखाली लहुजी शक्ती सेनेच्या वतीने (दि.९)रोजी तुळजापूर लातूर चौक येथे भव्य रास्तारोको आंदोलन करण्यात आले.सदरील आंदोलनाला भीमाआण्णा सामाजिक संघटना,हिंदू राष्ट्र सेना,व शिवप्रतिष्ठान यांचेकडून जाहीर पाटींबा देण्यात आला.
यावेळी कर्णाटक,उस्मानाबाद जिल्हा व इतर ठिकाणहुन संघटनेचे महिला आघाडी,युवक व प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते हजारोंच्या संखेने उपस्थीत होते.
चौकटः
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नियोजित केलेल्या रास्तारोको आंदोलन स्थळी पोलीस विभाग व तहसीलचे जबाबदार अधिकारी यानीं मागण्यांचे निवेदन स्वीकारुन आंदोलनास सहकार्य केले.
....................................................
आंदोलनकर्ते आंदोलन स्थळी उपस्थीत असतानां इतर नागरीकानीं टू व्हीलर द्वारे अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता पोलीस प्रशासनाच्या मदतीने हिंसक वळणावर नियंत्रण झाल्याने अनुचीत प्रकार घडला नाही.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा