Breaking

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

दरोड्याची तयारीतील सशस्त्र टोळी मुद्देमालासह पोलीसांनी केली जेरबंद....




दरोड्याची तयारीतील सशस्त्र टोळी मुद्देमालासह  पोलीसांनी केली जेरबंद....



श्रीगोंदा-नितीन रोही,

सदर प्रकाच्या गुन्ह्यांची माहिती दिनांक ३० रोजी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रामराव ढिकले श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना काही गुन्हेगार दरोड टाकण्याकरीता तयारीनिशी छोटा टॅम्पोमध्ये देऊळगावकडुन श्रीगोंदयाकडे येत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली पोलीस स्टेशन हदिमध्ये नाईट गस्त करीत असलेले पोसई अमित माळी व पोलीस कर्मचारी यांना सदरची माहिती देत त्यांना घुगलवडगांव शिवारात नाकेबंदी करुन आरोपींना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यावरुन पोसई माळी पोलीस कर्मचारी यांनी मांडवगण कडुन श्रीगोंदयाकडे येणा-या रोडवर घुगलवडगांव शिवारातील बाबा आमटे बहुउदेशी संस्था मेनगेट जवळ दिनांक 01/10/2021 रोजी 02/30 वा. नाकेबंदी करत असतांना समोरुन एक छोटा टॅम्पो आला. टॅम्पो अडविला टॅम्पोमधील संशयीत इसम ताब्यात घेत असतांना चार इसम पकडले व चार इसम रात्रीची वेळ असल्याने पळून गेले. आणि चार आरोपी ताब्यात घेत दरोडा टाकण्याकरीता वापरत असले कटावणी, नायलॉन दोरी, एक सुरा व मिरची पुड मिळुन आली संशयीत आरोपींना नाव गांव विचारले असता त्यांनी पोलिसांना  नावे 1) परमेश्वर उर्फ परमेश वैयशा भोसले वय 25 वर्षे, रा. भेडाळा ता. गंगापुर जि. औरंगाबाद 2) सचिन अशोक जाधव वय 24 वर्षे रा. प्रवरासंगम ता. नेवास जि. अहमदनग 3) महेश रामकिसन धोत्रे वय 21 वर्षे रा.प्रवरासंग ता. नेवासा जि. अहमदनगर 4) राजु शिवाजी जाधव वय 27 वर्षे रा. भेंडाळा ता. गंगापुर जि.औरंगाबाद अशी सांगितले आरोपींच्याकडे टॅम्पो, तीन लाकडी ड्रमला गुंडाळलेली केबल वायर किंमत रुपये 180000/ मिळुन आली. तसेच टाटा कंपनीचा टॅम्पो असा एकुण 5,30,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळाला.

पोलीस स्टेशन हदिध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वीत केलेली आहे रात्री संशतीय इसम दरोडा टाकण्याच्या तयारी येत आहेत अशी माहिती मिळाल्याने सदर माहिती ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्फत तात्काळ प्रसारित केला होता. श्रीगोंदा शहरात मांडवगण, काष्टी परिसरात नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत संदेश मिळताच त्यांनी घुगलवडगांव शिवारात एकत्र येवून वरील आरोपी ताब्यात घेतले. नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा कॉल आल्यानंत गावात परिसरात एकत्र जमवुन दरोडेखोर (आरोपी) यांना पकडण्याकरीता पोलीसांना मदत करावी जेणेकरुन पोलीस स्टेशन हदिमध्ये होणारे गुन्हे रोखण्याकरीता मदत होईल.

आरोपींकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी कोळगांव शिवार पोस्टे बेलवंडी हदितील भारत गॅस गोडाऊन वॉचमन मच्छिंद्र टोप्या काळे वय 50 वर्षे रा. कोळगाव ता. श्रीगोंदा व ट्रकचालक यांना मारहाण करुन वरील प्रमाण टॅम्पोमध्ये मिळुन आलेली केवल दरोडा टाकुन चोरी केलेली आहे. बेलवंडी पोलीस स्टेशन गु.रजि. नं. 403 / 2021 भा.द.वि.क.395,342,427 गुन्हा दाखल केला आहे. 1 ) परमेश्वरउर्फ परमेश वैयशा भोसले वय 25 वर्षे, रा. भेंडाळा ता. गंगापुर जि. औरंगाबाद याचेवर पूर्वी दाखल

असलेले गुन्हे 6) शेवगांव पोलीस स्टेशन गु.रजि. नं. 380/2021 भा.द.वि. कलम 399,402 आरोपी पोलीस कस्टडी मध्ये आसुन त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यत आहे.

1) कोपरगाव ग्रामिण पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 566/2020 भा.द.वि.क.395

2) कोपरगाव ग्रामिण पोलीस स्टेशन गु.रजि. नं. 487/2020 भा.द.वि.क.379,34 3) कोपरगाव ग्रामिण पोलीस स्टेशन गु.रजि. नं.39/2021 भा.द.वि.क.379,34

4) गंगापुर पोलीस स्टेशन औरंगाबाद ग्रामिण गु.रजि. नं.441/2020 भा.द.वि.क.461,380 5) गंगापुर पोलीस स्टेशन औरंगाबाद ग्रामिण गु.रजि. नं. 121/2014 भा.द.वि.क.324

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक  मनोज पाटील साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमा अग्रवाल साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  रामराव ढिकले, पोसई अमित माळी, सहा.पो.उप निरी. अंकुश ढवळे, सफ रमेश जाधव, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ अमोल कोतकर, पोकॉ वैभव गांगर्डे यांनी केली आहे.
 गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि दिलीप तेजनकर हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा