टेंभुर्णी ग्रामपंचायती विरोधात भाजयुमो करणार उपोषण--कोकाटे
टेंभुर्णी प्रतिनिधी
टेंभुर्णी ग्रामपंचायतीची मंजूर विकास कामे होत नसल्याने भारतीय जनता युवा मोर्चा तालुक्याचे उपाध्यक्ष विजय कोकाटे हे टेंभुर्णी ग्रामपंचायतीसमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शहराच्या मधून मधून जाणारा व त्यातील गाळ काढणे, टिळक रोड येथील मुख्य रस्त्यावर ठेकेदाराच्या चुकीमुळे रोडवर पाणी साचून राहत आहे ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे, महादेव गल्ली येथील महादेव मंदिरासमोरील मंजूर असलेले काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे, महादेव गल्ली येथील पांडुरंग कोल्हे ते शेवंता ढगे हा रस्ता कॉंक्रिटीकरण व्हावा, वार्ड क्रमांक तीन व चार हद्दीतून जाणारा कसबा गल्ली येथील रस्ता कॉंक्रिटीकरण व्हावा, संत वीरशैव कक्कय्या नगर येथील अंडरग्राउंड, गटारीचे काम लवकरात लवकर व्हावे वार्ड क्रमांक चार मधील मिरची बाजार येथील रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यात यावा तसेच पावसाचे दिवस असल्यामुळे टेंभुर्णी शहरांमध्ये डासाचे व जंतूंचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे सर्दी खोकला ताप असे साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे तरी ग्रामपंचायतीने सर्व वॉर्डांमध्ये बीएससी पावडर टाकण्याची व्यवस्था करण्यात यावी या मागण्यांसाठी तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विजय कोकाटे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा