चॕम्पियन्स आर्चरी अॕकेडमी टेंभुर्णीच्या १० धनुर्धरांनी राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत प्राप्त केली ३० पदके
टेंभुर्णी ( प्रतिनिधी )
टेंभुर्णी येथील चॕम्पियन्स आर्चरी अॕकेडमीतील १० धनुर्धरांनी पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत २७ पदके प्राप्त केली आहेत.
पुणे, फुलगाव येथे रुरल गेम्स आॕफ इंडियाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र भोस मिलिटरी स्कूल च्या प्रांगणात धनुर्विद्या च्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
या स्पर्धेत दहा वर्षाखालील मुलांच्या इंडियन राऊंड गटात कुणाल अगरकर ३ सुवर्ण पदक ( प्रथम ), अथर्व दौंड ३ रौप्य पदक ( द्वितीय ) ,तर रिकर्व्ह प्रकारात साईप्रसाद ढवळे ३ सुवर्ण पदक ( प्रथम ) यांनी यश संपादन केले तर १४ वर्ष वयोगटात इडियन राऊंड प्रकारात तुषार घाडगे ३ सुवर्ण ( प्रथम ) ,निशांत क्षिरसागर ३ रौप्य पदक ( द्वितीय ) , आविष्कार शिंदे ३ कांस्य पदक ( तृतीय ) तर मुलींच्या गटात समीक्षा देशमुख ३ सुवर्ण पदक ( प्रथम ),रेश्मा लोकरे ३ रौप्य ( द्वितीय ) तर १७ वर्ष वयोगटात इंडियन राऊंड मध्ये शिवराज देशमुख ३ सुवर्ण पदक ( प्रथम ) यशराज देशमुख ३ रौप्य पदक ( द्वितीय ) क्रमांक पटकावला आहे.
या धनुर्धरांनी १५ सुवर्ण पदके ,१२ रौप्य व ३ कांस्य अशी एकूण ३० पदके प्राप्त केली आहेत.
या सर्व धनुर्धरांना चॕम्पियन्स आर्चरी अॕकेडमीचे मार्गदर्शक राष्ट्रीय पंच प्रा.रमेश शिरसट यांचे मार्गदर्शन लाभले तर या धनुर्धरांचे कैलास देशमुख,आभिजित माने, भाऊसाहेब घाडगे ,दत्तात्रय क्षिरसागर सर, शिंदे गुरुजी , घाडगे ,कृषिआधिकारी आनंदराव ढवळे ,ग्रामसेवक नवनाथ दौंड याःनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा