Breaking

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

केंद्र सरकारने इंधन दरवाढीवर तोडगा न काढल्यास आंदोलन आणखीन तीव्र करू -संभाजी पाटील. राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून इंधन दरवाढी विरोधात आंदोलन


 केंद्र सरकारने इंधन दरवाढीवर तोडगा न काढल्यास आंदोलन आणखीन तीव्र करू -संभाजी पाटील                                राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून इंधन दरवाढी विरोधात आंदोलन    


AJ 24 Taas News
अमोल भोसले यास कडून

                                                                                  टेंभुर्णी (प्रतिनिधी)केंद्र सरकारने इंधन दरवाढीवर तोडगा न काढल्यास आंदोलन आणखीन तीव्र करू  असा आजच्या अनुदानातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस हा    इशारा देत असून या बेलगाम इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला असून त्याचे जगणे मुश्किल झाले आहे असे प्रतिपादन इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या आंदोलनामध्ये केंद्र सरकारचा निषेध करताना राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री संभाजी पाटील यांनी व्यक्त केले

 यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी शिवाजीराव पाटील यांनीही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला व केंद्र सरकारने वेळीच यावर उपाय काढावा असे विचार व्यक्त केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुकारलेल्या गेलेल्या केंद्र शासनाच्या महागाईच्या विरोधात आंदोलनामध्ये विषय डिझेल, पेट्रोल, आणि गॅस दरवाढ याविरोधात माढा तालुका राष्ट्रवादी युवक च्या माध्यमातून टेंभुर्णी येथे आंदोलन करण्यात आले आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली व केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देऊन व मनोगत व्यक्त करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागण्याचे निवेदन टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल लोंढे साहेब यांच्याकडे देण्यात आले. आंदोलनाला तालुका राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोसले, तालुका कार्याध्यक्ष रामराजे नलवडे, उपाध्यक्ष रामभाऊ नवले, ओबीसी सेल कार्याध्यक्ष अनिल तोडकर, युवक तालुका उपाध्यक्ष संजय मिस्कीन, निखील मोरे, हनुमंत गरड, आप्पासाहेब पाटील,जिल्हा उपाध्यक्ष सचिन लोंढे, दिगंबर फाळके, सरचिटणीस विकास बेडगे, किसान सेलचे उपाध्यक्ष भजनदास गायकवाड, पदवीधर चे उपाध्यक्ष सज्जन पाटील, सामाजिक न्याय विभागाचे प्रमोद गाडे, ओबीसी सेल उपाध्यक्ष अतुल काशीद, अल्पसंख्यांक सदस्य समीर मुलानी, टेंभुर्णी राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सविता जगताप, युवती महिला अध्यक्षा शितल लोंढे, विद्यार्थी चे अध्यक्ष रविंद्र बेंद्रे, टेंभुर्णी शहराध्यक्ष मयूर काळे, कार्याध्यक्ष तानाजी लोंढे, उपाध्यक्ष रोहन थोरात, राष्ट्रवादी सदस्य संतोष लोंढे, अकोले खुर्द चे सरपंच कांतीलाल नवले, माजी सरपंच महादेव घाडगे भाऊसाहेब, पंडित पाटील, adv रणजीत पाटील, गणेश भांगे, सतीश लिंगे, बापू देशमुख, उत्तम घाडगे,विद्यार्थी चे उपाध्यक्ष दयानंद मिस्कीन, दीपक कोयले, विकास शिंदे, बाबू देशमुख, आकाश मासुळे, विशाल चौगुले, रोहन साळुंखे सर्व राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा