Breaking

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

पुढच्या आठवड्यात आवाटीचे सबस्टेशन मंजूर करणार - आ.संजयमामा शिंदे .


पुढच्या आठवड्यात आवाटीचे सबस्टेशन मंजूर करणार  - आ.संजयमामा शिंदे .


कन्हेरगांव दि प्रतिनिधी

आवाटी चे सबस्टेशन येत्या आठ दिवसांत मंजूर करून या  भागातील शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार असल्याचे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले .
       करमाळा तालुक्यातील आवाटी  ,निमगांव  ,शेलगाव येथील विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी आमदार संजय मामा शिंदे बोलत होते . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप होते . 
              यावेळी  मृद व जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता प्रक्षाळे , सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता क्रमांक 1 चे  प्रताप कदम , उपविभागीय अधिकारी देशमुख , उपसरपंच फिरोज जाहगिरदार , माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी , सरपंच प्रशांत पाटील, राजेंद्र बारकुंड , आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळ ,
  आवाटी चे सरपंच संजय नलवडे , माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब निळ , निमगाव सरपंच लखन जगताप ,  शेलगाव चे सरपंच अशोक पाटोळे , कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे ,उपसरपंच कविता वीर  ,ग्रामसेवक बाबासाहेब खाडे , ग्रामपंचायत सदस्य लखन डावरे  ,धर्मराज शिंदे , यमुना वीर , सुलोचना जगताप , रेश्मा कुकडे , रामचंद्र काटोळे  , समाधान दौंड ,  प्रवीण शिंदे गुरुजी , गुळसडी चे माजी सरपंचमानसिंग खंडागळे , डॉ. विकास वीर ,उपसरपंच श्रीकांत निळ , सुरज ढेरे , अमोल भोसले  , सिद्धेश्वर जगदाळे , हनुमंत निळ , विक्रम कुंभार , सोमनाथ हलकरे  , श्रीराम निळ , गणेश निळ,  ऋषिकेश चव्हाण , दादा भोसले, अशोक काकडे , अशोक पाटील , महादेव डोके   आदी उपस्थित होते ‌.
          माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले की ,  2025 ला पुन्हा एकदा संजय मामा ला निवडून आणा आणि पन्नास वर्षे तालुका मागे गेलेला परत एकदा विकासाच्या वाटेवर आणून तालुक्याचा विकास साधण्याचे आवाहन जगताप यांनी केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा