वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माढा तालुका तहसील कार्यालयावर एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन*
माढा/प्रतिनिधी रेणुका रजपूत
वंचित बहुजन आघाडीचे_बाळासाहेब_आंबेडकर व महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखा ताई ठाकूर यांच्या नेतृत्वात तथा मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रभर झालेल्या वंचित बहुजन आघाडी तर्फे आयोजित मुस्लिम समाजाच्या #5% शैक्षणिक आरक्षण तत्काळ लागू करणे
#पैगंबर_मोहम्मद_बिल मंजूर करणे,संत_विचारांचे_प्रचारक ह.भ.प किर्तनकार व इमाम, हजरत यांना सरकारी मासिक वेतन तत्काळ चालू करणे
अश्या विविध मागण्यासाठी आज सोमवार दिनांक २२/११/२०२१ रोजी वंचित बहुजन आघाडी सोलापूर पश्चिम व माढा तालुका, कुर्डुवाडी शहर यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष मा. राहुल चव्हाण सर व जिल्हा महासचिव विशाल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली माढा तालुका तहसील कार्यालय समोर आज एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन पार पाडले...
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान हांडे तालुका अध्यक्ष समर्थ आखाडे.
वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव प्रवीण अण्णा वाघमारे,उपाध्यक्ष राजू लोंढे, दयानंद जानराव, कोषाध्यक्ष, अविनाश लोंढे, कुर्डुवाडी शहर अध्यक्ष प्रदीप सोनटक्के, उपाध्यक्ष अशपाक तवकल आदी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा