*नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक1, 2 व 3 तुळजापूर शाळेत इयत्ता 1ली ते 5वी चे वर्ग उत्साहात सुरू*
Covid-19च्या प्रादुर्भावामुळे सलग दीड वर्ष वर्षे बंद असलेली शाळा आज दिनांक 1 डिसेंबर 2021पासून शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आली. याअनुषंगाने नगर परिषद अंतर्गत शाळा क्रमांक1,2,3 तुळजापूर च्या पालिका शाळेमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन व खाऊ वाटप करून केले तसेच शाळांची भौगोलीक परस्थितीचा आढावा घेण्यात आला, शाळेचा परीसर स्वच्छतेबाबत ,जंतुनाशक फवारणी आदी सुविधांबाबत संबंधीत विभागास सुचना देण्यात आल्या तुळजापूर नगर पालिकेचे नगराध्यक्ष श्री. सचिन रोचकरी यांनी स्वता वरील शाळेची पहाणी केली सबंधीत मुख्याध्यापक,शिक्षक यांना शाळे विषयी अडचणी जाणुन घेतल्या सदरील शाळा पहाणी दौर्या मध्ये शिक्षण सभापती श्री. किशोर साठे,महिला बालकल्याण उपसभापती सौ.मंजुषाताई देशमाने, नगरसेवक श्री. पंडितराव जगदाळे,विजय आबा कंदले आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात शिष्यवृत्ती परीक्षा 2021मध्ये पात्र झालेल्या1) विराज मकरंद बाराते2)आदित्य आप्पासाहेब पवार 3)समर्थआनंद सप्ताळ या विद्यार्थ्यांचा तसेच MTS परीक्षेत केंद्रात पाचवा क्रमांक पटकावलेला चि.विराज मकरंद बाराते सह उत्तीर्ण 29 पैकी 29 विद्यार्थ्यांचा सत्कार शाल पुष्पगुच्छ, पुस्तक देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. रणजित भोजने पालक डॉ.मकरंद बाराते, श्री.महादेव चोपदार, श्री. आप्पासाहेब पवार ,श्री. आकाश सप्ताळ यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री. तुकाराम मोटे,मुख्याध्यापक डजेटीथोर सहशिक्षक श्री.अशोक शेंडगे ,श्री.जालिंदर राऊत,पाटीलसर,गणेश रोचकरी,महेंन्र्द कावरे सर, श्री.बालाजी साळुंके,श्री.विश्वजीत निडवंचे ,श्रीमती निता गायकवाड ,श्रीमती निर्मला कुलकर्णी, श्रीमती यास्मिन सय्यद श्री.संजित देडे,श्रीम. मीना वाळा यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा