Breaking

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया - रणजितसिंह शिंदे सापटणे (टें) येथे शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन



विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया - रणजितसिंह शिंदे 


सापटणे (टें) येथे शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन     

       

*AJ 24Taas News Network/टेंभुर्णी प्रतिनिधी/ अमोल भोसले


टेंभुर्णी (प्रतिनिधी):- माढा तालुक्यातील सापटणे (टें) हे गाव विकासाच्या योग्य मार्गावर आहे. संपूर्ण विकास झाला असे होत नसते, पण विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे असे जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे म्हणाले.
 ते सापटणे(टें) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेत पात्र लाभार्थ्यांना पत्र वाटप व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलत होते.


पुढे बोलताना रणजितसिंह शिंदे म्हणाले बंडू नाना ढवळे, विठ्ठल भाऊ, भिमराव आबा यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य काम चालू असून संजय गांधी निराधार सारख्या योजने ची 110 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. ही काम अतिशय कौतुकास्पद आहे. सदर योजनेची कागदपत्रे फार किचकट असून त्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक असते.

 संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेंतर्गत पात्र 110 लाभार्थ्यांना मंजूर आदेश देणे, गावातील व परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर यामध्ये ईसीजी, रक्त लघवी रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी, हृदयविकार, covid-19 लसीकरण, हिमोग्लोबिन तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळनेर यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात बंडू नाना ढवळे यांनी कार्यक्रमाचा हेतू, गावातील विद्यालयाचा व अतिरिक्त उसाचा प्रश्न मांडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास तोडकर यांनी आपले विचार व्यक्त केले. 
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी शिवाजीराव पाटील, आप्पासाहेब उबाळे, पंचायत समिती चे सतीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सचिन होदाडे, राष्ट्रवादी तालुका प्रसिद्धी प्रमुख सतीश काळे, पत्रकार धनंजय मोरे, आधार हॉस्पिटल चे डॉ विनायक रुपदास, ग्रामसेवक नेवरे भाऊसाहेब, नागेश खटके, जनार्दन ढवळे, तलाठी चव्हाण भाऊसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन ग्रामपंचायत सापटणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल भाऊ ढवळे यांनी केले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व  युवक कार्यकर्ते व ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा