*धनगर समाजाच्या एसटी आरक्षण संदर्भात, हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडावे,या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना निवेदन*
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडे निवेदन व्दारे यशवंत सेनेनं केली धनगर समाजाचा एसटी आरक्षण प्रश्न हिवाळी अधिवेशनात विधानभवनात मांडण्याची केली मागणी
धनगर समाज हा गेल्या 70 वर्षापासून एस टी आरक्षण झगड आहे आतापर्यंत धनगर समाजाने प्रत्येक पक्ष्यांला सहकार्य केले आहे परंतु कोणत्याही पक्ष्यांनी धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावू शकला नाही त्यामुळे धनगर समाजाचा कोणत्याही पक्ष्यावर व नेत्यावर भरोसा राहिला नाही त्यामुळे धनगर समाज आगामी काळात ठोस भूमिका घेणार आहे
1)1000 कोटी पॅकेज तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी
2) मेंढपाळ बांधवांवर वारंवार होणारे हाले थांबवण्यासाठी कडक कायदे करण्यात यावे
3) मेंढपाळ बांधवाला फिरत रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे
4) मेंढपाळ बांधवाच्या पाल्यांना वसतिगृह व शिक्षण मोफत देण्यात यावे
5)मागच्या सरकारने धनगर समाजासाठी 22 योजना लागू केली होती त्याची अंमलबजावणी करण्यात यावी या.आमच्या सर्व मागण्या विधानभवनात मांडून धनगर समाजाला न्याय द्यावा तुळजापूर विधानसभा मतदारसंघ धनगर समाज बहुसंख्येने असल्यामुळे आमचा विचार करावा नाहीतर आगामी होणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका सह सर्व निवडणूकीत अन्यथा यशवंत सेना प्रत्येक गाव निहाय बैठकीच्या माध्यमातून धनगर समाज जनजागृती मोहीम हाती घेऊन आमदाराच्या उमेदवाराला मतदान करू नका असा संदेश पोहचविणार आहे
या निवेदना वर सतत धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे यशवंत सेनेचे उस्मानाबाद जिल्हा प्रमुख संजय घोडके, तालुका प्रमुख उमाकांत लवटे, बालाजी फडताळे, अमोल गावडे, गजानन चाफे, नागेश बनसोडे, आप्पासाहेब पाटील, कपील देवकते, विशाल मदने, उमेश गावडे, नागनाथ घोडके, शेखर खांडेकर सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा