*स्वयं शिक्षण प्रयोग उस्मानाबाद यांच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील व्यवसायिक महिलांना डिजिटल माहिती देण्यात आली*
आज दिनांक 14/12/2021 स्वयं शिक्षण प्रयोग उस्मानाबाद यांच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर उस्मानाबाद उमरगा लोहारा व कळंब या तालुक्यातील गावपातळीवरील एकूण दीडशे व्यवसायिक महिलांना व्यवसायात येणाऱ्या व जाणाऱ्या पैशाचे रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने कसे ठेवावे तसेच एखाद्याचे येणे किंवा देणे असेल तर त्यांना डिजिटल पद्धतीने रिमाइंडर कसे द्यावे म्हणजेच एक प्रकारे व्यवसायाचं डिजिटल लेखाजोखा याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रथम स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या प्रोग्रॅम मॅनेजर तबस्सुम मोमीन यांनी संस्थेचे ओळख व कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
तसेच मेरा बिल ॲप च्या प्रतिनिधी अंजली उमाप यांनी हे ॲप कशा पद्धतीने वापरावे याबद्दलचे महिलांना प्रशिक्षण दिले व संस्थेचे जिल्हा समन्वयक माधव गोरकट्टे यांनी ही महिलांना मार्गदर्शन केले तसेच जिल्हा समन्वयक बाळासाहेब काळदाते यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तसेच संस्थेचे अंजना साबळे, शिल्पा वलदोडे, रोहिणी घोडके, सुजाता पाटील,शितल रणखांब,शाहिदा मुजावर,जयश्री कदम,राणी शिराळ,सुकेशनी धनके,आशा जाधव यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा