Breaking

रविवार, ३० जानेवारी, २०२२

निमगाव (टे.)चा विशाल शिंदे कॉमर्स विभागातून 'सेट' परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण


निमगाव (टे.)चा विशाल शिंदे कॉमर्स विभागातून 'सेट' परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण


 बेंबळे। प्रतिनिधी                    

               निमगाव टे. तालुका माढा येथील विशाल भाऊराव शिंदे हा युवक सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथून कॉमर्स विभागातून 'सेट 'परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे. विशाल शिंदे याचे प्राथमिक शिक्षण निमगाव टे. तालुका माढा येथे ,हायस्कूलचे शिक्षण नूतन विद्यालय कुर्डूवाडी येथून तर ज्युनिअर कॉलेज शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूर  येथून झाले आहे. त्याने आपले बी कॉम व एम् काँम चे  शिक्षण सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे तेथून पूर्ण केली आहे व याच विद्यापीठातून सेटची परीक्षा पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाला आहे. विशाल शिंदे हा पहिल्यापासूनच स्कॉलर विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. वीशाल हा पिंपळनेरचे केंद्रप्रमुख व तसेच निमगाव चे पत्रकार भाऊराव शिंदे यांचा मुलगा असुन तो सध्या पुणे येथे एमपीएससी च्या वरीष्ठ श्रेणीच्या परीक्षेची तयारी करत आहे.
 या यशाबद्दल विशाल शिंदे याचे आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे जिल्हा परिषद सदस्य रणजीत भैय्या शिंदे माढा तालुक्याचे सभापती विक्रम दादा शिंदे पंचायत समिती सदस्य धनराज दादा शिंदे तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी व अनेक पत्रकारांनी विशाल शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा