शेतकरी मेळाव्याचे आयोजन…
वात्सल्य व कृषी विज्ञान केंद्राचा उपक्रम.
वात्सल्य सामाजिक संस्था व कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगरूळ व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील कार्यक्रम वात्सल्य सामाजिक संस्थेच्या मंगरूळ येथील भुजंगराव घुगे स्मृती सभागृहात दि.4-1-2022 वार मंगळवार रोजी स.10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.सदरील कार्यक्रमास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
सेंद्रिय शेती,जमिनीची समस्या व उपाय,रब्बी पिकातील कीड रोग व्यवस्थापन,शेतीतील कमी खर्चाचे तंत्रज्ञान,या विषयावर प्रा. लालासाहेब देशमुख श्री.ए.एन.जाधव,डॉ. भगवान अरबाड,डॉ. श्रीकृष्ण झगडे,श्रीमती अपेक्षा कसबे या लातूर व तुळजापूर येथील शेतीतज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून सदरील कार्यक्रम होणार आहे.या मेळाव्यास प्रथम नोंदणी,प्रथम प्राधान्य असून नाव नोंदणी बंधनकारक असेल नाव नोंदणीसाठी 9921060053 व 8830031581
या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा