*राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची तुळजापूर तालुका कार्यकारिणी जाहीर*
भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची तुळजापूर तालुका कार्यकारिणी शुक्रवार ३१डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे संस्थापक अध्यक्ष संतोष निकम यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आली
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होणाऱ्या हल्ल्यावर तसेच त्यांच्या विविध मागण्यांसाठी व समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सतत आवाज उठवावा यासाठी मा. संतोष निकम यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची २०२२ ची उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तालुका कार्यकारिणी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव संजय गायकवाड ,राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष चांदसाहेब शेख , राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख मनोज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तालुका उपाध्यक्ष पदी रुपेश डोलारे , बालाजी गायकवाड , प्रतीक भोसले तर तुळजापूर शहराध्यक्ष पदी शुभम कदम तर शहर संघटकपदी मकबूल तांबोळी तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी जुबेर शेख , तालुका कार्यकारिणी सदस्य पदी प्रताप मोरे व प्रसाद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पाहुणे म्हणून वसंत कांबळे , जानराव यांच्यासह विश्वगामी पत्रकार संघाचे वरिष्ठ पदाकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी संघटनेच्या ध्येय धोरणाची उपस्थित मान्यवरांनी सविस्तर माहिती दिली तसेच वेळोवेळी सहकार्य करण्याचे एकमेकांना आवाहन केले आज आपल्या संघटनेचे बीजारोपण केले असून याचे लवकरच वटवृक्षात रूपांतर होणार असल्याचे प्रतिपादन विविध वक्त्यांनी आपल्या मनोगतात अधोरेखित केले यावेळी पत्रकार संघाचे बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा