Breaking

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

लोहारा येथे गरजूंना किराणा किटचे वाटप.*


*लोहारा येथे गरजूंना किराणा किटचे वाटप.*


प्रतिनिधी :- रूपेश डोलारे उस्मानाबाद.



लोहारा येथे बळीराजा चारिटेबल ट्रस्ट किलज अंतर्गत शाखा लोहारा तर्फे लोहारा शहरातील एकूण १०० गरजू व्यक्तींना किराणा किटचे वाटप करण्यात आले.बळीराजा ट्रस्ट ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.ही संस्था शेतकऱ्यच्या प्रश्नांसाठी सतत प्रयत्नशील असून गरजूंना मदतीचा हात या उद्देशाने या संस्थेतर्फे संस्थेच्या ठिकठिकाणच्या  कार्यक्षेत्रातील तालुक्यातील गरजूंना सध्या किराणा किटचे वाटप सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर लोहारा शहरातील गरजूंना सुद्धा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी बळीराजा चारिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा.संगीता राठोड,उपाध्यक्ष.तुकाराम शिंदे,सचिव आनंद निर्मळे,बबिता कांबळे,सारिका जावळे, आशा पाटील,मैला शेख, यांच्या सह लोहारा शाखेतील सहकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा