Breaking

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

मंजुषाताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त काल सावित्रीबाईंच्या प्रेरणेतून विधवा महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान...*



*मंजुषाताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त काल सावित्रीबाईंच्या प्रेरणेतून विधवा महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान...*



प्रतिनिधी :- रूपेश डोलारे उस्मानाबाद

     दि...27. 1. 2022 रोजी तीळ गूळ कार्यक्रम उमरगा येथे आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
     कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. पारंपारीक  हळदी कुंकवाला फाटा देत गरीब,विधवा, होतकरी महिला भगिनी यांना साडी,चोळी ,पुस्तक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षा शिवमती सुनंदाताई माने ह्या होत्या. प्रमुख उपस्थिती मराठा सेवा संघाचे विभागीय सचिव भास्कर वैराळे, शिवमाती विजया ताई चव्हाण ग्रा. स. गुंजोटी, जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्षा शिवमती रेखाताई पवार, संभाजी ब्रिगेडचे जि.उपाध्यक्ष शिवश्री प्रदीप भोसले, दाळींब ग्रा.प.चे ग्रा.प.सदस्य शिवश्री हिराजी गायकवाड पाटील, जिजाऊ ब्रिगेड शहर अध्यक्षा शिवमती संध्याताई शिंदे, जिजाऊ ब्रिगेड ता.उपाध्यक्षा शिवमती साधनाताई पवार, जिजाऊ ब्रिगेड शहर सचिव शिवमती लताताई भोसले,मिनाक्षीताई दुबे, तसेच मुळज,ञिकोळी,माडज,नाईचाकुर,
एकोंडी,तुरोरी शाखेच्या सर्व पदाधिकरी व उमरगा शहरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा