Breaking

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

कीर्तन हे प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून कीर्तन सेवेला सुरुवात- ह. भ. प इंजि. प्रविण महाराज पिंपळदरीकर


कीर्तन हे प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून कीर्तन सेवेला सुरुवात- ह. भ. प इंजि. प्रविण महाराज पिंपळदरीकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

नांदेड: दि:२५ जानेवारी किर्तन हे प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे म्हणून सुप्रसिद्ध  शिवचरित्रकार इंजि. प्रवीण जाधव पिंपळदरीकर
यांनी कीर्तन रुपी सेवेला सुरुवात केली आहे.
त्यांचे पहिले कीर्तन त्यांचे गाव  पिंपळदरी येथे गेल्या वीस वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह. व नारायण देव यात्रेच्या निमित्ताने संपन्न झाले, अगदी लहान वयापासून प्रबोधनाच्या क्षेत्रात त्यांचं काम चालू असते. गावकऱ्यांनी त्यांच्यामधील चुणूक पारखून त्यांना कीर्तन पाहिले गावातच व्हावे असा आग्रह केला आणि त्यांनीही सकारात्मक विचार समाजाला देण्यासाठी मी तयार आहे म्हणत सुरुवात केली. 
धर्माचे पालन करणे ! करणे पाखांड खंडण या जगद्गुरू तुकोबाराय यांच्या अभंगावर त्यांनी चिंतन केले आणि समाजातील वाईट गोष्टींना थारा देऊ नका, संतांनी दिलेला विवेकवाद जागृत करून समाजाला दिशा देण्याचं काम मी नक्की करेन. आणि हे फक्त आपल्याला संताचा आधार घेऊनच करता येत. संतांनी जगाला विज्ञान चा मार्ग दाविला अंधश्रद्धा,कर्मकांड अज्ञानीपणा ह्या सर्व गोष्टीला फाटा देण्यासाठी संत चरित्रे अभ्यासणे गरजेचे,
              पुढे बोलताना प्रविण महाराज म्हनाले की आम्हाला जगाला मानवतावाद द्यायचा, माणुसकी चे दर्शन घडवणारी ही संत चरित्र आहेत. कीर्तनातून जनजागृती करण्यास सुरुवात केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गावकरी मंडळी मित्र परिवार, व्याख्यानाच्या माध्यमातुन त्यांनी जोडलेला प्रत्येक घटक त्यांचे अभिनंदन करत आहे.. त्यांना गायनासाठी साथ दिली मारोती महाराज हिंदोळे कर, रमेश पाटील खैरगाव साईनाथ पाटील खैरगाव. आनंद पाटिल कापसी डॉ. दरेगावकर महाराज सुगावे महाराज खैरगाव. केदार महाराज पांचाळ महाराज. व सर्व टाळकरी मंडळी. एक नविन कीर्तनकार गावात तयार झाला म्हणून गावकरी मंडळी आनंदित झाली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा