Breaking

शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

तुळजाभवानीचा शाकंभरी महोत्सवानिमित्त असंख्य महिलांनी डोक्यावरती घेतला कलश, देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणून जलयात्रेची ओळख*



*तुळजाभवानीचा शाकंभरी महोत्सवानिमित्त असंख्य महिलांनी डोक्यावरती घेतला कलश, देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणून जलयात्रेची ओळख*



*AJ 24Taas News Maharashtra/साठी  रुपेश डोलारे तुळजापूर 


उस्मानाबाद- महाराष्ट्र ची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील प्रमुख जलयात्रेचा उत्सव आज मोठ्या आनंदात पार पडला कोरोनचे निर्बंध पाळत सुवासिनी महिलांनी डोक्यावर पाण्याची घागर घेऊन या उत्सवात सामील झाल्या होत्या गेली चार दिवसा पासून तुळजाभवानी मंदिरात देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू आहे या शाकंभरी नवरात्र मधील मुख्य उत्सव म्हणजे जलदिंडी हा उत्सव यात मुख्य आकर्षण असते ते सुहासिनी महिलांचे  तुळजापुर शहर व पंचक्रोशीतील सुवासिनी पापनास तिर्थ येथील जल डोक्यावरील कलशात भरतात व त्यावर नारळ ठेवुन वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढली जाते.या दिंडीसोबत सगळ्या पुढे ढोलीबाजा आराधी ,वाघ्या मुरळी हे सगळे जण या उत्सवात अगदी हिरिरीने सहभागी होतात या उत्सवा बद्दल अनेक अखियका देवीचे पुजारी सांगत आहेत जल यात्रेतील रथा मध्ये वेगवेगळ्या भाज्या फळे ठेवुन देवीची मुर्ती उभा करतात चांदीच्या कलशात पापनास तिर्थाचे जल भरुन ठेवले जाते शिवाजी चौक ते तुळजाभवानी मंदिर पर्यंत ही यात्रा पायी निघते महिलांनी आणलेले याच पाण्याने देवीचा मंदिर परिसर स्वच्छ करण्यात येतो मंदिर स्वच्छ झाल्या नंतर  या महिलांचा साडी चोळी देऊन मंदिर समिती कडून सत्कार ही करण्यात आला पाणी वाचवा न्याचा संदेश अगदी देवदेवतांच्या कालावधी पासून दिला जातो हाच संदेश घेऊन हा उत्सव तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र मोहत्सव मध्ये साजरा केला जात असल्याची आख्यायिका आहे व या सगळ्या रीती रिवाजाप्रमाणे आम्ही या उत्सवात सहभाग नोंदवला असल्याचे महिला सांगत आहेत


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा